दीक्षाभूमीच्या विकासासाठी कटिबद्ध - सुधीर मुनगंटीवार
By Admin | Published: October 20, 2016 12:50 AM2016-10-20T00:50:36+5:302016-10-20T00:50:36+5:30
चंद्रपूरची दीक्षाभूमी हे भारतातील पवित्र स्थळ असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, ..
चंद्रपूर: चंद्रपूरची दीक्षाभूमी हे भारतातील पवित्र स्थळ असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीद्वारे आयोजित ६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाच्या मुख्य समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. प्रमुख अतिथी अमेरिकेचे होझान अलन सेनाडके, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आ. नाना शामकुळे आठवले, आ. नाना शामकुळे, प्रधान सचिव श्याम तागडे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, जि.प. सीईओ देवेंद्र सिंग, धम्मचारी मैत्रेयनाथ, धम्मचारी वीरधम्म, संस्थेचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, अॅड. राहुल घोटेकर, सखाराम पालतेवार, धर्मपाल घोटेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी डॉ. बाबासाहेबांची धम्मदीक्षा ही जगातील सर्वश्रेष्ठ मानव कल्याण करणारी क्रांती आहे, असे म्हटले. अध्यक्षीय भाषणात अरुण घोटेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. तो सहेतूक आहे. धम्माद्वारे स्वत:च्या संस्कृतीचा आपण शोध घेतला आहे. धर्मातराद्वारे भारतात सदाचरण रुजविण्याचा हा दिन आहे. त्यामुळे धम्माच्या क्षेत्रात फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. येणाऱ्या पिढ्यांच्या भल्यासाठी आपण ही धम्म चळवळ सर्वशक्तीनिशी संघटीतपणे पुढे नेण्याचा संकल्क करु. या लाखोंच्या संख्येने आपण आला आहात आपण सर्वांनी बुद्ध, बाबासाहेबांचे विचार घेतले जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात प्रास्ताविक अशोक घोटेकर यांनी केले. संचालन प्रा.मनोज सोनटक्के व आभार वामनराव मोडक यांनी मानले. (प्रतिनिधी)