‘बेवारस’ रकमांच्या विनियोगासाठी समिती
By admin | Published: September 4, 2014 01:51 AM2014-09-04T01:51:27+5:302014-09-04T01:51:27+5:30
रकमेचा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल याविषयी शिफारशीसाठी केंद्रीय वित्त मंत्रलयाने बुधवारी समितीची स्थापना केला.
Next
नवी दिल्ली : देशभरातील टपाल कार्यालयांत पीपीएफसह विविध बचत योजनांच्या खात्यांमध्ये तसेच सार्वजनिक क्षेत्रतील बँकांच्या बचत खात्यांमध्ये, कोणीही दावेदार नाही म्हणून, ‘अनक्लेम्ड’ स्वरूपात किती रक्कम पडून आहे याचा अंदाज घेण्यासाठी तसेच या रकमेचा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल याविषयी शिफारशीसाठी केंद्रीय वित्त मंत्रलयाने बुधवारी समितीची स्थापना केला.
‘अनक्लेम्ड’ रकमा असलेली अशी बहुतांश खाती ज्येष्ठ नागरिकांची आहेत व त्यात पडून राहिलेली रक्कम ही त्यांनी केलेली बचत आहे. त्यामुळे तिचा विनियोग ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी करणो उचित होईल, असे जेटली यांचे म्हणणो होते. परंतु हा विचार उतरविण्याआधी अशी बचत योजनांची खाती किती आहेत व त्यातील ‘अनक्लेम्ड’ रकमांचा आकडा किती आहे, याचा अंदाज करणो गरजेचे आहे. त्यानंतर अशा रकमा एकत्रित कशा करायच्या व त्यांचाविनियोग कसा करायचा या मुद्दय़ांवर विचार करावा लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्वित्तमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना या विषयाचा आवजरून उल्लेख केला होता व टपाल कार्यालये व बँकांच्या बचत योजना खात्यांमधील अशा ‘अनक्लेम्ड’ रकमांचा उल्लेख ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी करण्याचा विचार मांडला होता.