गोदान एक्सप्रेसच्या जनरल बोगीत आग म्हसावदजवळील घटना : पाउण तास थांबली गाडी स्थानकावर

By admin | Published: May 21, 2016 12:06 AM2016-05-21T00:06:48+5:302016-05-21T00:06:48+5:30

जळगाव: मुंबईवरुन डाऊन मार्गावर जाणार्‍या गोदान एक्सप्रेस (क्र.१०५५) च्या जनरल बोगीत शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले होते. काही प्रवाशांनी म्हसावदजवळ साखळी ओढल्याने गाडी थांबविण्यात आली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. यावेळी ४५ मिनिटे गाडी थांबविण्यात आली होती.

Common Bovine fire of Gondal Express near Mhasawad: Poona hours stop at the train station | गोदान एक्सप्रेसच्या जनरल बोगीत आग म्हसावदजवळील घटना : पाउण तास थांबली गाडी स्थानकावर

गोदान एक्सप्रेसच्या जनरल बोगीत आग म्हसावदजवळील घटना : पाउण तास थांबली गाडी स्थानकावर

Next
गाव: मुंबईवरुन डाऊन मार्गावर जाणार्‍या गोदान एक्सप्रेस (क्र.१०५५) च्या जनरल बोगीत शुक्रवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले होते. काही प्रवाशांनी म्हसावदजवळ साखळी ओढल्याने गाडी थांबविण्यात आली होती. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. यावेळी ४५ मिनिटे गाडी थांबविण्यात आली होती.
मुंबई लोकमान्य टर्मिनस स्थानकावरुन सुटलेल्या गोदान एक्सप्रेसमध्ये शेवटून दुसर्‍या क्रमांकाच्या जनरल बोगीत (क्र.सीआरपी ७४२६) अचानक धूर निघायला लागल्याने प्रवाशी घाबरले, त्यामुळे धावपळ उडाली. हळूहळू धूर जास्त निघायला लागल्याने काही प्रवाशांनी म्हसावदजवळ साखळी ओढली तर काही जणांनी पोलीस नियंत्रण कक्ष व पोलीस अधिक्षकांना फोनवरुन माहिती दिली.
म्हसावद पोलीस धावले मदतीला
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी म्हसावद दूरक्षेत्राचे सचिन मुंडे व सुशील मगरे यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले व जळगावहून अग्निशमन दलाचे दोन बंब पाठविले. दरम्यान बंब पोहचण्याच्या आत या स्टेशन मास्तर एस.टी.जाधव व पोलीस कर्मचार्‍यांनी प्रवाशांच्या मदतीने आग विझवली होती.
धोका टळल्याची खात्री पटल्यानंतर गाडी मार्गस्थ
या घटनेमुळे म्हसावद स्थानकावर तब्बल ४५ मिनिटे गाडी थांबविण्यात आली होती. आग लागली त्या बोगीत व शेजारच्या बोगीतही काही शॉर्टसर्कीट नाही ना? याची खात्री केल्यानंतर प्रवाशांना आता कोणताच धोका नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर गाडी पुढच्या मार्गाला रवाना करण्यात आली. दरम्यान, यावेळी प्रवाशांची धावपळ उडाल्याने काही प्रवाशी एकमेकाच्या अंगावर पडले होते, सुदैवाने त्यात कोणालाही लागले नाही.

Web Title: Common Bovine fire of Gondal Express near Mhasawad: Poona hours stop at the train station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.