राष्ट्रकुल घोटाळा: पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2015 03:17 PM2015-09-02T15:17:16+5:302015-09-02T15:22:19+5:30

२०१० मधील राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतील न्यायालयाने पहिली शिक्षा सुनावली असून पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Commonwealth scandal: Four years imprisonment for five offenders | राष्ट्रकुल घोटाळा: पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

राष्ट्रकुल घोटाळा: पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ - २०१० मधील राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतील न्यायालयाने पहिली शिक्षा सुनावली असून पाच दोषींना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आली आहे. यामध्ये दिल्ली महापालिकेतील चार अधिका-यांचा समावेश आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील न्यायालयासमोर सुनावणी सुरु होती. बुधवारी न्यायालयाने याप्रकरणात निकाल दिला असून दिल्ली महापालिकेतील चार व आणखी एक दोषीला कोर्टाने चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर मुख्य आरोपी व स्वेका पॉवरटेकचे व्यवस्थापकीय संचालक टी पी सिंह यांना सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे काँग्रेस व दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्या अडचणीत आले होते. तर काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांना या घोटाळ्यामुळे मत्रिपद गमवावे लागले.याप्रकरणात कोर्टाने दिलेली ही पहिलीच शिक्षा आहे.  

Web Title: Commonwealth scandal: Four years imprisonment for five offenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.