"या गुंडांच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय?" जंतर-मंतरवरील घोषणाबाजीवरून ओवेसी भडकले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:42 PM2021-08-10T13:42:33+5:302021-08-10T13:43:18+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

Communal slogans at jantar mantar AIMIM owaisi says whats the secret of increasing courage of these goons | "या गुंडांच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय?" जंतर-मंतरवरील घोषणाबाजीवरून ओवेसी भडकले; म्हणाले...

"या गुंडांच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय?" जंतर-मंतरवरील घोषणाबाजीवरून ओवेसी भडकले; म्हणाले...

Next

नवी दिल्ली - 'भारत जोडो आंदोलना'च्या पार्श्वभूमीवर काही कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करत रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शन करण्यात आले. यावेळी शेकडो लोक येथे जमले होते. तसेच, यावेळी काही आक्षेपार्ह सांप्रदायिक घोषणाही देण्यात आल्या, असा आरोप आहे. यावर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. (Communal slogans at jantar mantar AIMIM owaisi says whats the secret of increasing courage of these goons)

यासंदर्भात ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, "गेल्या शुक्रवारी द्वारका येथे हज हाऊसविरोधात एक 'महापंचायत' बोलावण्यात आली. हस्ब-ए-रिवायत, या पंचायतीतही मुस्लीम विरोधी घोषणा देण्यात आल्या. जंतर मंतर मोदींच्या महालापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. काल तेथे 'जब मुल्ले काटे जाएंगे..' सारख्या वाईट घोषणा देण्यात आल्या."

ओवैसी म्हणाले, "या गुंडाच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय? यांना माहीत आहे, की मोदी सरकार यांच्या पाठीशी उभे आहे. 24 जुलैला भारत सरकारने रासुका (NSA)अंतर्गत दिल्ली पोलिसांना कुण्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार दिला होता. तरीही दिल्ली पोलीस शांतपणे तमाशा पाहत उभे होते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की न्याय आणि कायदेशीर कारवाईची मागणी करणेही मजाक बनले आहे. यावर लोकसभेतही चर्चा व्हायला हवी. मी, या मुद्द्यावर लोकसभेच्या नियमानुसार स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे."

मुस्लिमविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी माजी भाजपा प्रवक्ते अश्विनी उपाध्यायसह 6 जणांना अटक

'भारत जोडो मूव्हमेंट'च्या नावाने एकत्र आले होते लोक -
पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे काही लोक 8 ऑगस्ट 1947 ला झालेल्या 'भारत छोडो आंदोलना'च्या धर्तीवर ‘भारत जोडो मूव्हमेंट’ नावाने एकत्र आले होते. लोकांना एकत्र आणण्यासाठी या आंदोलनाचा सोशल मीडियावर चांगलाच प्रचार करण्यात आला होता.  जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंह आणि महासचिव अरविंद त्यागी यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील अश्विनी उपाध्याय, नीरज नक्षत्र चौहान, लोकसंख्या समाधान फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चौधरी, हिंदू रक्षा दलाचे भूपेंद्र चौधरी, आर्य निर्मात्री सभेचे सुनील आर्य, देवसेनेकडून वृजभूषण सैनी, मां कामधेनू फाउंडेशनचे दीपक तोमर, हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता आणि देशभरातून शेकडो लोक आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

यासंदर्भात बोलताना अश्विनी उपाध्याय म्हणाले, त्यांचा कार्यक्रम यूनायटेड भारतासाठी होता. ज्यांनी धर्मविरोधी घोषणाबाजी केली, त्यांचा आमच्या संघटनेशी काहीही संबंध नाही.
 

Web Title: Communal slogans at jantar mantar AIMIM owaisi says whats the secret of increasing courage of these goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.