Communal Violence: राजस्थानच्या भीलवाडानंतर आता हनुमानगडमध्येही तणाव, VHP नेत्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:32 AM2022-05-12T09:32:41+5:302022-05-12T09:34:05+5:30

Communal Voilence In Rajasthan: विश्व हिंदू परिषदच्या नेत्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Communal Violence In Rajasthan: After Bhilwara in Rajasthan, now there is tension in Hanumangarh too, VHP leader attacked | Communal Violence: राजस्थानच्या भीलवाडानंतर आता हनुमानगडमध्येही तणाव, VHP नेत्यावर हल्ला

Communal Violence: राजस्थानच्या भीलवाडानंतर आता हनुमानगडमध्येही तणाव, VHP नेत्यावर हल्ला

Next

Communal Voilence In Rajasthan:राजस्थानमध्ये पुन्हा एकदा जातीय तणावाचे प्रकरण समोर आले आहे. हनुमानगड जिल्ह्यात बुधवारी रात्री विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) स्थानिक नेत्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. सध्या विहिंप नेत्याला बिकानेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण 
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील नोहरमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते सतवीर सहारन यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सतवीर सहारनचे काही साथीदारही जखमी झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण हनुमानगढच्या नोहर येथील मंदिरासमोर झाले. येथील काही तरुण अनेकदा महिलांची छेड काढत असे. यावर सतवीरने त्या तरुणांना हटकल्यामुळे वाद सुरू झाला.  यावेळी हल्लेखोरांनी सतवीरच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

विहिंप कार्यकर्त्यांचा चक्काजाम
या घटनेनंतर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नोहर रावतसर रस्ता अडवला. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. हनुमानगडचे जिल्हाधिकारी आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती हाताळली.

परिसरातील इंटरनेट सेवा बंद
आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा येथून हलणार नाही, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. त्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर रात्री उशिरापासून नोहर, भद्रा आणि रावतसरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन परिसरात फ्लॅग मार्च काढत आहे. अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Communal Violence In Rajasthan: After Bhilwara in Rajasthan, now there is tension in Hanumangarh too, VHP leader attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.