कम्युनिस्ट पक्षांची एकी?
By Admin | Published: July 11, 2017 01:38 AM2017-07-11T01:38:49+5:302017-07-11T01:38:49+5:30
देशात पुन्हा एकसंघ कम्युनिस्ट पक्ष तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी येथे व्यक्त केली.
हैदराबाद : भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या दोन्ही पक्षांचे येत्या चार-पाच वर्षांत एकीकरण होऊन देशात पुन्हा एकसंघ कम्युनिस्ट पक्ष तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुरावरम सुधाकर रेड्डी यांनी येथे व्यक्त केली.
रेड्डी म्हणाले की, सन १९६४ मध्ये प्रामुख्याने ज्या कारणांमुळे कम्युनिस्ट चळवळीत फूट पडली, ती कारणे आता पूर्णपणे गैरलागू झाली आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र येण़्याची गरज प्रबळ झाली आहे.
देशातील डावी चळवळ सध्या अडचणीत आहे, त्यामुळे एकच
काम दोन पक्षांनी करण्याचे टाळणे श्रेयस्कर होईल, असेही रेड्डी यांनी
स्पष्ट केले.