450 रुपयांमध्ये 'ही' कंपनी दर महिन्याला देणार तब्बल 1000 जीबी डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 07:53 PM2018-06-05T19:53:10+5:302018-06-05T19:54:35+5:30
ग्राहकांना मिळणार 78 एमबीपीएस स्पीड
मुंबई: व्होडाफोननं यू ब्रॉडबँडनं वायर्ड ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये काही नवे प्लान्स लाँच केले आहेत. यामध्ये वर्षभराच्या मुदतीच्या एका नव्या प्लानचा समावेश आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना 12 टीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमधील ग्राहकांना 78 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. यासाठी ग्राहकांना दर महिन्याला 450 रुपये द्यावे लागतील.
YOU प्लानमधील 12 टीबीच्या प्लानची किंमत 5,399 रुपये (करांसहीत) आहे. म्हणजेच या प्लानसाठी ग्राहकाला महिन्याकाठी 450 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं 78 एमबीपीएसच्या स्पीडचे तीन नवे ब्रॉडबँड लाँच केले आहेत. यामध्ये 3 टीबी डेटाच्या प्लानचाही समावेश आहे. हा प्लान 90 दिवसांचा असून त्यासाठी ग्राहकाला दर महिन्याला 649 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच तीन महिन्यांसाठी ग्राहकाला 1,947 रुपये (करांसहित) मोजावे लागतील.
व्होडाफोननं याच धर्तीवर 6 टीबीचा प्लानदेखील लाँच केला आहे. या प्लानची मुदत 180 दिवस आहे. यासाठी ग्राहकाला दर महिन्याला 486 रुपये मोजावे लागतील. तर सहा महिन्यांसाठी 2,915 रुपये (करांसहित) द्यावे लागतील. तर वर्षभराच्या प्लानसाठी ग्राहकाला दर महिन्याला 450 रुपये द्यावे लागतील. हे प्लान्स घेणाऱ्या ग्राहकांना इन्स्टॉलेशनसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. याशिवाय राऊटरदेखील मोफत मिळेल. मात्र सध्या तरी हा प्लान कंपनीनं हैदराबादपुरता मर्यादित ठेवला आहे. तशी माहिती कंपनीनं संकेतस्थळावर दिली आहे.