काँग्रेसची संघटनात्मक बांधणी संघाच्या तुलनेत कमकुवत- पी. चिदंबरम

By admin | Published: March 19, 2017 04:51 PM2017-03-19T16:51:30+5:302017-03-19T16:51:30+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे

Compared to Congress's organization building team, P. P. Chidambaram | काँग्रेसची संघटनात्मक बांधणी संघाच्या तुलनेत कमकुवत- पी. चिदंबरम

काँग्रेसची संघटनात्मक बांधणी संघाच्या तुलनेत कमकुवत- पी. चिदंबरम

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. मात्र त्या तुलनेत काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याचं मत काँग्रेसचे नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडलं आहे. कोलकात्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोणत्याही निवडणुकीच्या दिवशी मत स्वतःकडे खेचून आणण्याची क्षमता संघटनेत असावी लागते. त्यासाठी संघटनेची बांधणीही महत्त्वाची असते. मात्र काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कमजोर असल्याचं म्हणत पी. चिदंबरम यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. पण भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूतल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या विरोधात जनाधार खेचण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच त्यांचा पदरी अपयश पडेल, असंही पी. चिदंबरम यांनी सूतोवाच केले आहेत.

काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला 29 राज्यांत 29 प्रकारची वेगवेगळी धोरणं राबवावी लागतील. समजा गुजरातचे धोरण आसाममध्ये राबवल्यास ते चालेलच असे नाही, ही कल्पना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. नोटाबंदीचा विचार करता राजकीय लढाईत भाजपा वरचढ ठरत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी आर्थिक मुद्द्यांवरील काँग्रेसचे विश्लेषण खरे ठरले आहे. देशाचा जीडीपी 7.83 टक्क्यांवरून 6.61 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तसेच जनता सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी धजावत नाही. कारण जर आपण सरकारच्या विरोधात बोललो तर आपल्यालाही त्रास होईल हा विचार करून जनता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याची टीकाही पी. चिदंबरम यांनी केली आहे. एकंदरीतच चिदंबरम यांनी स्वपक्षीयांसोबत काँग्रेसलाही चिमटे काढले आहेत.

Web Title: Compared to Congress's organization building team, P. P. Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.