जगाच्या तुलनेत भारतात कॉलड्रॉपचे प्रमाण जास्त
By admin | Published: March 12, 2016 03:37 AM2016-03-12T03:37:58+5:302016-03-12T03:37:58+5:30
दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने स्वीकार्य कॉलड्रॉप २.० टक्के निर्धारित केले आहे; पण देशात याचे सरासरी प्रमाण किती तरी जास्त म्हणजे ४.७२ टक्के आहे. याबाबत जागतिक निकष मात्र ३.० टक्के आहे
नवी दिल्ली : दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने स्वीकार्य कॉलड्रॉप २.० टक्के निर्धारित केले आहे; पण देशात याचे सरासरी प्रमाण किती तरी जास्त म्हणजे ४.७२ टक्के आहे. याबाबत जागतिक निकष मात्र ३.० टक्के आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
बहुतेक कॉलड्रॉप अडथळे किंवा गुणवत्तेशी संबंधित अन्य घटकांमुळे होतात. त्याचवेळी स्पेक्ट्रमचा अभाव आणि ग्राहकांची जास्त संख्या हे घटकही कॉलड्रॉपला कारणीभूत आहेत. नेटवर्कचा योग्य वापर केल्यास कॉलड्रॉपची समस्या बऱ्याच प्रमाणात निकाली निघू शकते.
‘रेडमँगो अॅनालिटिक्स’ या संस्थेने मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि जम्मूसह देशभरातील २० शहरांत सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे. वाईट ‘कव्हरेज’ असणाऱ्या प्रदेशात कॉलड्रॉपचे प्रमाण ४ टक्के असल्याचे त्यात आढळून आले आहे.
५९. टक्के कॉलड्रॉप वाईट गुणवत्ता आणि ३६.९ टक्के कॉलड्रॉप नेटवर्कमधील नादुरुस्तीमुळे होतात, असेही हा अहवाल म्हणतो.
खराब गुणवत्तेचे कारण रेडिओ सिग्नलमधील अडथळा आहे. त्यामुळे कॉल ड्रॉप होतात, असे अहवालात म्हटले आहे.