पीडितेच्या पित्याने स्वीकारली भरपाई

By admin | Published: May 4, 2015 12:41 AM2015-05-04T00:41:57+5:302015-05-04T00:41:57+5:30

छेडखानीनंतर धावत्या बसमधून फेकून दिल्याने मृत्यू झालेल्या पीडित युवतीच्या पित्याने चार दिवसानंतर धरणे आंदोलन मागे घेत तिच्या शवविच्छेदनाला

Compensation of the victim's father | पीडितेच्या पित्याने स्वीकारली भरपाई

पीडितेच्या पित्याने स्वीकारली भरपाई

Next

मोगा : छेडखानीनंतर धावत्या बसमधून फेकून दिल्याने मृत्यू झालेल्या पीडित युवतीच्या पित्याने चार दिवसानंतर धरणे आंदोलन मागे घेत तिच्या शवविच्छेदनाला सहमती दर्शविल्याने या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. नुकसानभरपाई आणि सरकारी नोकरीचा प्रस्ताव मान्य करीत त्यांनी मुलीच्या अंत्यसंस्काराची तयारी दर्शविली.
कोणत्याही दबावाखाली न येता शवविच्छेदनाला व अंत्यसंस्काराला तयार असल्याचे पीडित मुलीच्या पित्याने पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. धावत्या बसमधून छेडछाडीनंतर फेकून दिलेल्या व यातच मृत्यू झालेल्या मुलीच्या पीडित कुटुंबाने रविवारी संध्याकाळी आंदोलन मागे घेतले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Compensation of the victim's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.