स्पर्धा आयोगाकडून सात सिमेंट कंपन्यांना २0६ कोटींचा दंड

By admin | Published: January 20, 2017 05:45 AM2017-01-20T05:45:08+5:302017-01-20T05:45:08+5:30

टेंडर प्रकरणात हात मिळवणी केल्याच्या आरोपाखाली सात सिमेंट कंपन्यांना २0६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय भारतीय स्पर्धा आयोगाने दिला

Competition Commission fined 206 crores for seven cement companies | स्पर्धा आयोगाकडून सात सिमेंट कंपन्यांना २0६ कोटींचा दंड

स्पर्धा आयोगाकडून सात सिमेंट कंपन्यांना २0६ कोटींचा दंड

Next

नवी दिल्ली : हरियाणा सरकारच्या २0१२ मधील एका टेंडर प्रकरणात हात मिळवणी केल्याच्या आरोपाखाली सात सिमेंट कंपन्यांना २0६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय भारतीय स्पर्धा आयोगाने दिला आहे.
दंड झालेल्या कंपन्यांत श्री सिमेंट, अल्ट्राटेक, जेपी असोसिएटस, जेके सिमेंट, अंबुजा सिमेंट, एसीसी आणि जेके लक्ष्मी सिमेंट यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, दंडाची रक्कम ६0 दिवसांच्या आत भरण्याचे आदेश आयोगाने
कंपन्यांना दिले आहेत. या कंपन्यांनी संगनमत करून स्पर्धात्मकतेला खोडा घातला. त्यामुळे हरियाणा सरकारला हे टेंडरच रद्द करावे लागले, असे आयोगाने म्हटले आहे.
टेंडरच्या कालावधीत या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी एसएमएस आणि फोन कॉलच्या माध्यमातून संगनमत केल्याचे सिद्ध झाले.
स्पर्धा आयोगाकडून सिमेंट कंपन्यांना दंड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी कारवाई झाली आहे. अशा कारवाया पुन्हा करू नका, अशी ताकिद आयोगाने १२0 पानी निकालपत्रात दिली आहे.
उलाढालीच्या 0.३ टक्के दंड
या कंपन्यांना त्यांच्या एकूण उलाढालीच्या 0.३ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याची एकत्रित रक्कम २0६ कोटी रुपये होते. कंपनीनिहाय दंडाची रक्कम अशी : अल्ट्राटेक ६८.३0 कोटी, जयप्रकाश असोसिएट्स ३८.0२ कोटी, श्री सिमेंट १८.४४ कोटी, जेके सिमेंट ९.२६ कोटी, अंबुजा सिमेंट २९.८४ कोटी, एसीसी ३५.३२ कोटी, जेके लक्ष्मी सिमेंट ६.५५. (वाणिज्य प्रतिनिधी)
>संगनमत करून भरल्या मोठ्या रकमेच्या निविदा
हरियाणा सरकारच्या पुरवठा संचालकांनी यासंबंधीची तक्रार केली होती. कंपन्यांनी हातमिळवणी करून मोठ्या किमतीच्या निविदा भरल्याचा आरोप त्यांनी केला होता. सीसीआयने २0१४ मध्ये चौकशीचे आदेश दिले होते.

Web Title: Competition Commission fined 206 crores for seven cement companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.