मटकाचालकांसह ‘पुढारी’वर गुन्हा दाखल

By admin | Published: October 13, 2015 04:13 AM2015-10-13T04:13:20+5:302015-10-13T04:13:20+5:30

गोव्यात राजरोसपणे मटका चालविणाऱ्या अकराशे बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत

The complainant on the 'leader' along with the makers | मटकाचालकांसह ‘पुढारी’वर गुन्हा दाखल

मटकाचालकांसह ‘पुढारी’वर गुन्हा दाखल

Next

पणजी : गोव्यात राजरोसपणे मटका चालविणाऱ्या अकराशे बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. रायबंदर-पणजी येथे क्राईम ब्रँचच्या कार्यालयात गुन्हा नोंद झाला आहे.
गोव्यात राजरोसपणे मटका जुगार चालत असतानाही पोलीस कारवाई करत नाहीत. राजकीय पाठबळ आणि हप्तेशाहीमुळे जुगार चालकांना कोणाचेही भय उरलेले नाही. शिवाय, वृत्तपत्रांमधून मटक्याचे आकडे प्रसिद्ध होत असल्याने या जुगाराचा प्रसार वेगाने होण्यास हातभार लागत आहे. मटक्याच्या जुगारामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, तरुण पिढीही यात ओढली जात आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती.
या याचिकेची दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. त्यानुसार ११०० मटका बुकी, ‘कल्याण’, ‘मिलन’, ‘स्टार’ आदी नावांनी मटक्याचे रॅकेट चालविणारे गुजरातमधील मटकाचालक, निनावी राजकारण्यांसह ‘पुढारी’ आणि ‘तरुण भारत’ या वृत्तपत्रांवर भा.दं.वि. कलम १०९, १२० (बी), (३४), गोवा-दमण-दीव जुगारविरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे हे करीत
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The complainant on the 'leader' along with the makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.