तक्रारकर्त्यास डांबले पोलीस कोठडीत... जोड
By admin | Published: September 15, 2015 06:49 PM2015-09-15T18:49:15+5:302015-09-15T18:49:15+5:30
डोईफोडे हा पोलीस चौकीत बसला असताना आरोपी दारू प्यायला असल्याचे त्याला कसे कळले, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या चौकीतील पोलीस शिपायाची मनमानी वाढल्याने त्याच्यावर कारवाई करण्ण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात वृत्त लिहिस्तो कुठलीही कारवाई केली नव्हती. (वार्ताहर)
Next
ड ईफोडे हा पोलीस चौकीत बसला असताना आरोपी दारू प्यायला असल्याचे त्याला कसे कळले, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या चौकीतील पोलीस शिपायाची मनमानी वाढल्याने त्याच्यावर कारवाई करण्ण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात वृत्त लिहिस्तो कुठलीही कारवाई केली नव्हती. (वार्ताहर)---चौकट---वादग्रस्त पोलीस चौकीनांद गाव हे संवेदनशील मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली. येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहायक फौजदाराकडे या चौकीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहायक फौदाराच्या मदतीला पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे ही पोलीस चौकी वादग्रस्त ठरत चालली आहे. हा प्रकार भिवापूरच्या ठाणेदारांना माहिती असूनही ते याकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ----महिला पडली बेशुद्धही पोलीस चौकी सदैव बंद असते. त्यामुळे तक्रार नोंदविण्यास येणाऱ्यांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. मागील महिन्यात एक महिला या चौकीत तक्रार नोंदविण्यासाठी आली होती. त्याहीवेळी चौकी बंद होती. तिने अंदाजे दोन-अडीच तास प्रतीक्षा केली. काही वेळाने ती चौकीच्या गेटसमोर बेशुद्धावस्थेत पडली. सदर प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलीस पोहोचले नाही. शेवटी नागरिकांनी तिला उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. ----वाहनातील पेट्रोलची चोरी अपघातग्रस्त वाहने या पोलीस चौकीच्या आवारात जमा केली जातात. ही वाहने सुपूर्दनाम्यावर सोडली जाईपर्यंत आवारातच पडून असतात. या चौकीत एका तरुणाची नियुक्ती केली आहे. हा तरुण चौकीत साफसफाईची व पोलिसांची इतर कामे करतो. हा तरुण चौकीच्या आवारातील वाहनांच्या टँकमधील पेट्रोल काढत असल्याने अनेकदा स्थानिक नागरिकांनी बघितले. मात्र, त्याला कुणीही समज दिली नाही. त्यामुळे या प्रकराला पोलिसांचे अभय असल्याचे स्पष्ट होते. ---