दिल्लीतील महिलेची जाट आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याची तक्रार
By admin | Published: February 28, 2016 08:03 PM2016-02-28T20:03:12+5:302016-02-28T20:03:12+5:30
दिल्लीतील एका महिलेने जाट आंदोलनादरम्यान मुरथलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
हरियाणा, दि. २८ - दिल्लीतील एका महिलेने जाट आंदोलनादरम्यान मुरथलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी 7 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रारीत दीराचं नावदेखील असल्याने पोलिसांनी कौटुंबिक वादातून तक्रार केली असल्याची शंका व्यक्त केली आहे.
पिडीत महिलेने डीआयजी राजश्री सिंग यांना शनिवारी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार महिलेने जाट आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याची तक्रार केली असल्याची माहिती डीआयजी राजश्री सिंग यांनी दिली आहे. महिलेने तक्रारीत २२ आणि २३ फेब्रुवारीच्या रात्री बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी महिलेचा जवाब नोंद करुन घेतला आहे, तसंच तक्रारदेखील दाखल करुन घेण्यात आहे.
महिलेने 7 लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे ज्यामध्ये तिच्या दीराचा देखील समावेश आहे. आम्हाला ही तक्रार कौटुंबिक वादातून केली असल्याची शंका डीआयजी राजश्री सिंग यांनी व्यक्त केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत. मात्र या महिलेव्यतिरिक्त अजून कोणत्याही महिलेने अशाप्रकारची तक्रार केलेली नाही.
मुरथलमध्ये महिलांचे फाटलेले कपडे रस्त्यावर सापडल्यानंतर बलात्कार झाल्याच्या शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. एका ट्र्क ड्रायव्हरनेदेखील काही महिलांनी जाट आंदोलनादरम्यान खेचत नेल्याचं पाहिलं होतं बलात्कार झाला की नाही ? माहिती नसल्यांचं एएनआयला सांगितलं होतं. हरियाणा सरकारने पिडीत महिलांना पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं होतं.