‘उडता पंजाब’ फूट प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार
By admin | Published: June 17, 2016 02:36 AM2016-06-17T02:36:40+5:302016-06-17T02:36:40+5:30
सैराट पाठोपाठ उडता पंजाब या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी फुटल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रोडक्शन हाऊसतर्फे दाखल झालेल्या तक्रारीवरुन सायबर सेलने तपास सुरु केला आहे. सायबर सेलने
मुंबई : सैराट पाठोपाठ उडता पंजाब या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी फुटल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रोडक्शन हाऊसतर्फे दाखल झालेल्या तक्रारीवरुन सायबर सेलने तपास सुरु केला आहे. सायबर सेलने याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु केली आहे.
अनुराग कश्यपची सहनिर्मिती असलेला ’उडता पंजाब’हा
चित्रपट पंजाबमधील तरुणाईला बसलेल्या ड्रग्सच्या विळख्यावर
भाष्य करणारा चित्रपट आहे. चित्रपटातील काही दृश्यांवरून निर्माण झालेल्या वादातून मुक्तता मिळून दोन दिवसही झाले नसताना बुधवारी उडता पंजाब या चित्रपटाला धक्का बसला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची सेन्सॉर कॉपी फुटल्याने खळबळ उडाली. बुधवारी रात्री या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी आॅनलाईन लीक झाली. यातील एक क्लिप ४० मिनिटांची, तर दुसरी दोन तास २० मिनिटांची आहे.
याप्रकरणी पेंटॉम हाऊस प्रॉडक्शन तर्फे सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आयटी अॅक्टनुसार टेक्निकल एक्स्पर्ट आणि रिसर्च विंगने याचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात पाचशेहून अधिक साईटवर उडता पंजाबचे प्रसारण झाले. त्यापैकी दिडशे साईट्स ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. (प्रतिनिधी)
वेबसाईट्सही गुन्हेगार...
डाटा चोरी आणि कॉपीराईटचे उल्लंघन केल्यामुळे उडता पंजाब लीक प्रकरण हे सायबर क्राईममध्ये मोडते. ही बाब वेबसाईटच्या लक्षात आणून देऊनही त्यांनी ते हटविण्यास नकार दिला. त्यामुळे तेही गुन्ह्याला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.
- अॅड. प्रशांत माळी, सायबर लॉ आणि आय.पी.आर तज्ज्ञ