ऊसतोड न मिळाल्याने कर्मचारी, शेतकर्यांमध्ये वाद परस्परांविरोधात तक्रारी
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:25+5:302014-12-20T22:27:25+5:30
तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील बिद्री साखर कारखान्याला सेंटर ऑफिसमधून वेळेत ऊसतोड मिळत नाही. याउलट उशिरा लावण केलेल्या शेतकर्याचा ऊस तोडला जातो. याबद्दल तक्रार करत गेलेले मांगोली येथील शेतकरी दादासो चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला, तर बोगस करार केल्याने खोटी नोंद कळवल्याबद्दल पाटील यांनी रोजंदारी कर्मचार्यास मारहाण केल्याची फिर्याद शेती मदतनीस बी. एस. चौगले यांनी राधानगरी पोलिसात केली असून ऊसाला तोड का दिली नाही याबद्दल कर्मचार्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नोंद केले आहे.
Next
त रंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील बिद्री साखर कारखान्याला सेंटर ऑफिसमधून वेळेत ऊसतोड मिळत नाही. याउलट उशिरा लावण केलेल्या शेतकर्याचा ऊस तोडला जातो. याबद्दल तक्रार करत गेलेले मांगोली येथील शेतकरी दादासो चंद्रकांत पाटील यांनी कर्मचार्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला, तर बोगस करार केल्याने खोटी नोंद कळवल्याबद्दल पाटील यांनी रोजंदारी कर्मचार्यास मारहाण केल्याची फिर्याद शेती मदतनीस बी. एस. चौगले यांनी राधानगरी पोलिसात केली असून ऊसाला तोड का दिली नाही याबद्दल कर्मचार्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नोंद केले आहे. तुरंबे येथे बिद्री कारखान्याचे शेती कार्यालय आहे. तुरंबे, कपिलेश्वर, मांगोली या गावातील शेतकर्यांना ऊस लागण नोंद व ऊस तोडणीचे हे कार्यालय आहे. आज मांगोलीचे शेतकरी ऊस तोडणीसंदर्भात कार्यालयात आले होते. यावेळी आमच्या उसाची तोड कधी येणार, माझ्यानंतर लावण केलेली ऊसतोड सुरू झाली आहे. असे विचारताच कर्मचार्यांनी शिवीगाळ केल्याचे पाटील यांनी सांगितले. तर कारखान्याचे रोजंदारी कर्मचारी श्रीपती पाटील म्हणाले, पाटील यांनी माझ्या डोक्यात दगड मारत असताना दुसर्या कर्मचार्याच्या हातावर लागला, तर यापूर्वी तीन वेळा याच शेतकर्याने खोटे करार केले असल्याचे सांगितले.