महिला छेडछाडीची ट्विटरवरुन तक्रार, योगींचा धडक कारवाईचा आदेश
By admin | Published: March 23, 2017 01:01 PM2017-03-23T13:01:17+5:302017-03-23T13:10:01+5:30
एका महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या छेडछाडीच्या तक्रारीची तात्काळ दखल घेताना योगी आदित्यनाथ यांनी कारवाईचे आदेश देण्यामध्ये थोडा वेळही लावला नाही
Next
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 23 - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महिला सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कमतरता ठेऊ इच्छित नसून यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. एका महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या छेडछाडीच्या तक्रारीची तात्काळ दखल घेताना योगी आदित्यनाथ यांनी कारवाईचे आदेश देण्यामध्ये थोडा वेळही लावला नाही. महिलेच्या नातेवाईकांनी ट्विटरच्या माध्यमातून ही तक्रार केली होती. योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना याप्रकरणी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
ही घटना होळीची आहे, जेव्हा काही स्थानिक तरुण दारुच्या नशेत असताना कल्याणपूर परिसरातील एका घरात घुसले. घरात घुसल्यानंतर त्यांनी महिला आणि तिच्या मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलेच्या पतीने बचाव करत विरोध केला असता त्यांना माहराण करण्यात आली.
महिलेच्या पतीने जेव्हा कल्याणपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. मात्र पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे न घेतला दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. पोलीस कोणतीच कारवाई करत नसून दिरंगाई करत असल्याने अखेर त्यांनी डीजीपी आणि मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करुन घटनेची माहिती देत मदत मागितली.
Hon,ble #CM Sir, Please take necessary action @yogi_adityanath@CMOfficeUP@Uppolice@javeeddgpup@igzonekanpur@digkanpur@kanpurnagarpolpic.twitter.com/ImKabSUSXk
— ASTHA Gautam (@ASTHAGautam6) March 21, 2017
यानंतर लगेच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. 'डीजीपींनी फोन करुन तात्काळ या घटनेचा अहवाल सोपवण्यास सांगितलं असल्याचं', एसपी सचिंद्र पटेल यांनी सांगितलं आहे. 'आपण स्वत: त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना वैद्यकीय मदत पुरवलं असल्याचं', सचिंद्र पटेल बोलले आहेत. 'आरोपींविरोधात मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलं असल्याचंही', त्यांनी सांगितलं आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच कुटुंबाला पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे.