ए.टी.पाटील यांच्या संचालकपदाला विरोध दूध संघाच्या बैठकीत तक्रारी : कैलास ट्रेडर्स, अरूण पाटील यांच्या निविदा रद्द, एनडीडीबीला काम देणार

By admin | Published: November 2, 2015 12:04 AM2015-11-02T00:04:17+5:302015-11-02T00:04:17+5:30

मुख्य १साठी

Complaint against Milk Union meeting in Calcutta Traders, Arun Patil's cancellation of Tender, NDDB to work | ए.टी.पाटील यांच्या संचालकपदाला विरोध दूध संघाच्या बैठकीत तक्रारी : कैलास ट्रेडर्स, अरूण पाटील यांच्या निविदा रद्द, एनडीडीबीला काम देणार

ए.टी.पाटील यांच्या संचालकपदाला विरोध दूध संघाच्या बैठकीत तक्रारी : कैलास ट्रेडर्स, अरूण पाटील यांच्या निविदा रद्द, एनडीडीबीला काम देणार

Next
ख्य १साठी

जळगाव- जिल्हा दूध संघाच्या बैठकीत संचालकांनी खासदार ए.टी.पाटील यांच्या दूध संघातील तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्तीला आक्षेप घेतला. पाटील हे कामात ढवळाढवळ करतात. इतर संचालकांना विचारणा करीत नाही, अशा तक्रारी संचालकांनी केल्या. तसेच दूध संघात १०० कोटी रुपयांची यंत्रणा खरेदी करण्यासंबंधी अरूण पाटील व कं. आणि कैलास ट्रेडर्स यांच्या निविदा करून हा प्रस्ताव करण्यासाठी व इतर सर्व कार्यवाहीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी)ची नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शनिवारी दुपारी ही मासिक बैठक दूध संघात झाली. अध्यक्षस्थानी मंदाकिनी खडसे होत्या. संचालक ॲड.वसंतराव मोरे, चिमणराव पाटील, अशोक चौधरी, अशोक पाटील, श्यामल झांबरे, मधुकर राणे, हेमराज चौधरी, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

निविदांची पद्धत संशयास्पद
दूध संघात १०० कोटींची यंत्रणा खरेदीसाठी कैलास ट्रेडर्सना दीड कोटी रुपये देऊन प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी नियुक्त करणे व अरुण पाटील व कं.यांना अडीच कोटी रुपये प्रस्ताव तयार करण्यासह इतर कार्यवाहीसाठी देण्याची निविदा पद्धत संशयास्पद आहे. यांना हे काम देण्याऐवजी एनडीडीबीची त्यासाठी नियुक्ती करा. अधिक पैसे लागले तरी चालेल, अशी मागणी संचालकांनी केली. ही बाब लक्षात घेता एनडीडीबीला प्रस्ताव तयार करण्याचे काम देण्याचा निर्णय झाला.

ए.टी.पाटील यांच्या संचालकपदाला विरोध
दूध संघाच्या पोटनियमानुसार दूध संघात तज्ज्ञ संचालक लोकनियुक्त संचालकांची नियुक्त करायचा आहे. तज्ज्ञ संचालकाने दुग्ध व्यवसाय (डेअरी) व त्यासंबंधीचे शिक्षण घेतलेले असावे, संबंधित व्यक्ती ही एनडीडीबी किंवा इतर शासकीय संस्थांमध्ये काम करून निवृत्त झालेली असावी, दुग्ध व्यवसायासंबधीच्या पदविका, पदवीचे शिक्षण घेतलेले असावे, असा निकष आहे. परंतु खासदार ए.टी.पाटील हे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहे. ते कामकाजात अधिकचा हस्तक्षेप करतात, अशा तक्रारी संचालकांनी केल्या. पण याबाबत अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही. किंवा कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.

खडसेंची घेतली भेट
बैठकीनंतर सर्व संचालकांनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची अजिंठा विश्रामगृहात रविवारी सायंकाळी भेट घेतली. या भेटीतही काही संचालकांनी ए.टी.पाटील यांना संचालकपदावरून दूर करण्याची मागणी केली.

कर्मचार्‍यांना बोनस, महिन्यात दोनदा बैठक
दूध संघात संचालक मंडळाची बैठक महिन्यात दोनदा घेण्याचा व कर्मचार्‍यांना १२ दिवसांचे वेेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय झाला.

Web Title: Complaint against Milk Union meeting in Calcutta Traders, Arun Patil's cancellation of Tender, NDDB to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.