राहुल गांधी 'पंजा'मुळेच अडचणीत, भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
By Admin | Published: January 14, 2017 03:05 PM2017-01-14T15:05:53+5:302017-01-14T16:11:56+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाचे निवडणूक चिन्ह पंजामुळेच अडचणीत आले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - भाजपाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात आचार संहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे चिन्ह 'पंजा'चा संबंध विविध धर्मांच्या देवांसोबत जोडला.
'जेव्हा मी देवदेवतांची प्रतिमा पाहतो तेव्हा त्यात मला काँग्रेसचे चिन्ह 'पंजा' दिसते', असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.
11 जानेवारी रोजी काँग्रेसच्या 'जन वेदना' आंदोलनातील भाषणादरम्यान राहुल गांधींनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल गांधींच्या या विधानाची सीडीच भाजपाने निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केली आहे. याव्यतिरिक्त राहुल गांधींनी आचार संहितेसोबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचेही उल्लंघन केले, अशी तक्रारदेखील करण्यात आली आहे.
'राहुल गांधी यांनी धर्मासंदर्भातील वक्तव्य करत काँग्रेसचे निवडणूक चिन्ह 'पंजा'चा संबंध शंकर, गुरुनानक, बुद्ध, इस्लाम आणि महावीर यांच्यांशी जोडला. राहुल गांधी जाणूनबुजून लोकांना धार्मिक भावनांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत', असा आरोपही भाजपाने केला आहे. काँग्रेसचे चिन्ह रद्द करुन राष्ट्रीय पार्टीचा दर्जा काढून घेण्याची मागणीही भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा राहुल गांधींविरोधात अशाच प्रकारच्या तक्रारी पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातही करणार आहेत
#डरो_मत Watch the full speech #जन_वेदना_सम्मेलन :https://t.co/gbsht0XXSa
— Office of RG (@OfficeOfRG) 11 January 2017