मनपाची लिफ्ट चालवितात नागरिक आयुक्तांकडे तक्रार: गंभीर घटनेची भीती
By Admin | Published: December 27, 2015 12:20 AM2015-12-27T00:20:25+5:302015-12-27T00:20:25+5:30
जळगाव : महापालिकेतील लिफ्ट चक्क नागरिक चालवत असल्याची तक्रार कॉ. शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली असून हा प्रकार एखाद्या वेळी जीवघेणा ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. सुरू असलेल्या लिफ्टवर तातडीने कर्मचारी नेमावेत असेही सुचविण्यात आले आहे.
ज गाव : महापालिकेतील लिफ्ट चक्क नागरिक चालवत असल्याची तक्रार कॉ. शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली असून हा प्रकार एखाद्या वेळी जीवघेणा ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. सुरू असलेल्या लिफ्टवर तातडीने कर्मचारी नेमावेत असेही सुचविण्यात आले आहे. मनपा कर्मचारी संघटनेच्या या निवेदनात म्हटले आहे की, मनपाच्या विविध विभागातील कर्मचारी संख्येचे अवलोकन केले असता काही विभागात आवश्यकतेपेक्षा जास्त शिपाई असल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे लिफ्टवर असलेल्या कर्मचार्यांची संख्या तोकडी आहे. बर्याच वेळेस लिफ्टवर कर्मचारी नसल्यास घाईत थोड्या माहितीच्या आधारावर नागरिक लिफ्ट पाहीजे त्या मजल्यावर घेऊन जातात व ती तेथेच थांबून असते. अपूर्ण माहितीच्या आधाराव लिफ्ट वर खाली नेणे एखाद्या वेळी धोकादायकही ठरू शकते. असे आहेत कर्मचारीमनपातील विविध २५ विभागात कार्यरत असलेले शिपाई पुढील प्रमाणे आहेत. महापौर कार्यालय ३, उपमहापौर कार्यालय ३, सभापती दालन ४, विरोधी पक्षनेता दालन २, नरग रचना विभाग ७, भांडार विभाग ३, विधी शाखा ३, नगर सचिव २, विधी शाखा ३, नगरसचिव कार्यालय २, वाहन विभाग ३, अस्थापना विभाग ७, बांधकाम विभाग ५, प्रकल्प शाखा २, आरोग्य विभाग ७, पाणी पुरवठा ३, मार्केट वसुली ७, किरकोळ वसुली ४, खुला भुखंड ४, एलबीटी विभाग ११, लेखा विभाग ५, जन्म-मृत्यू विभाग ६, विद्युत विभाग ३, ग्रंथालय सानेगुरुजी ४ या प्रमाणे शिपाई संख्या आहेत. काही विंभागात अपेक्षेपेक्षा कमी शिपाई संख्या दिसून येते. त्यामुळे हे कर्मचारी लिफ्टवर देता येऊ शकतात. या गंभीर विषयाबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा संघटनेचे अनिल नाटेकर यांनी निवेदनाव्दारे व्यक्त केली आहे.