जवानाची तक्रार तथ्यहीन

By admin | Published: January 15, 2017 12:08 AM2017-01-15T00:08:27+5:302017-01-15T00:08:27+5:30

नियंत्रण रेषेवरील जवानांना निकृष्ट अन्न मिळत असल्याच्या बीएसएफ जवान तेजबहादूर यादवच्या तक्रारीत तथ्य नाही, असे गृहमंत्रालयाने पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाला

Complaint of the complaint | जवानाची तक्रार तथ्यहीन

जवानाची तक्रार तथ्यहीन

Next

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवरील जवानांना निकृष्ट अन्न मिळत असल्याच्या बीएसएफ जवान तेजबहादूर यादवच्या तक्रारीत तथ्य नाही, असे गृहमंत्रालयाने पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
तेजबहादूरने सोशल मीडियावर ‘व्हिडिओ व्हायरल’ करून जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याची तक्रार केली होती. या व्हिडिओमुळे देशभर खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने या प्रकरणी चौकशी करून पीएमओला अहवाल सादर केला. नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना निकृष्ट अन्न दिले जात असल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे या तक्रारीला सत्य मानू नये, असे या अहवालात म्हटले आहे.
निकृष्ट अन्नाबाबतच्या तेजबहादूरचा व्हिडिओ सोशल मीडियावर ३० लाख वेळा पाहण्यात आला आहे. या व्हिडिओनंतर पंतप्रधान कार्यालयाने याबाबत गृहमंत्रालयाकडून अहवाल मागितला होता. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
पीएमओला सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, कोणत्याही चौैकीवर तैनात जवानांसाठी रेशनचा तुटवडा नाही. त्याचबरोबर जेवणाच्या दर्जाची नियमित तपासणी करण्यात येते.
गृहमंत्रालयाने निमलष्करी दलांना सर्व जवानांच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याचे तसेच जवानांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा आणखी सुधारण्याचे आदेश दिले आहेत, असे पीएमओला सांगण्यात आले.

नवी मार्गदर्शक तत्वे जारी
- अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोपही तेजबहादूरने केला होता.
- चौकीवर अन्नधान्याची ददात असू नये याची बीएसएफ खबरदारी घेते. तैनात जवानांनी कधीही अशी तक्रार केलेली नाही. बीएसएफने आपल्या जवानांना चांगले अन्न मिळावे यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Web Title: Complaint of the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.