सीतेला टेस्ट ट्यूब बेबी बोलणाऱ्या दिनेश शर्मांच्या अडचणी वाढल्या, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 09:50 AM2018-06-02T09:50:51+5:302018-06-02T09:50:51+5:30

या विधानाने त्यांच्यासमोरील अडचणी वाढविल्या आहेत.

complaint filed in bihar court against up deputy cm remark on sita test tube baby | सीतेला टेस्ट ट्यूब बेबी बोलणाऱ्या दिनेश शर्मांच्या अडचणी वाढल्या, तक्रार दाखल

सीतेला टेस्ट ट्यूब बेबी बोलणाऱ्या दिनेश शर्मांच्या अडचणी वाढल्या, तक्रार दाखल

Next

पाटणा- सीतेचा जन्म टेस्ट ट्युबनं झाल्याचं विधान उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या चांगलचं अंगलट येण्याची शक्यता आहे. या विधानाने त्यांच्यासमोरील अडचणी वाढविल्या आहेत. बिहारमधील सीतेची जन्मभूमी असणाऱ्या सीतामढी जिल्ह्यात मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात दिनेश शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

स्थानिक वकील ठाकूर चंदन सिंह यांनी शनिवारी सकाळी मुख्य न्याय दंडाधिकारी सरोज कुमारी यांच्या कोर्टात आक्षेप पत्र दाखल केलं. 'दिनेश शर्मा यांनी सीतेवर केलेल्या टिप्पणीमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या विधानातून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो आहे, असं त्यांनी आक्षेप पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, या प्रकरणावर आज सुनावणी होणा आहे. 

नेमकं काय म्हणाले होते दिनेश शर्मा?
सीतेचा जन्म मातीच्या भांड्यामध्ये झाला होता. म्हणजेच त्यावेळी टेस्ट ट्युबनं मुलांना जन्म देण्याची पद्धत प्रचलित होती. त्यामुळे सीतेचा जन्मसुद्धा टेस्ट ट्युबनं झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
रामायण काळात माता सीतेचा जन्म एका मातीच्या भांड्यात झाला होता. त्यामुळे रामायण काळापासून टेस्ट ट्युब बेबीची पद्धत अस्तित्वात होती. इतक्यावरच न थांबता महाभारत आणि रामायण काळाचा हवाला देत त्यांनी भगवान नारदमुनी पत्रकार असल्याचंही म्हटलं आहे.
 

Web Title: complaint filed in bihar court against up deputy cm remark on sita test tube baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.