Gujrat Assembly electoin 2022: पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल, पोलिंग बूथ जवळ रोड शो केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:57 AM2022-12-06T09:57:21+5:302022-12-06T09:57:47+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्याचं मतदान पूर्ण झालं आहे. आता ८ डिसेंबर रोजी निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Complaint filed by Election Commission against Prime Minister Modi allegation of road show near polling booth | Gujrat Assembly electoin 2022: पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल, पोलिंग बूथ जवळ रोड शो केल्याचा आरोप

Gujrat Assembly electoin 2022: पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल, पोलिंग बूथ जवळ रोड शो केल्याचा आरोप

googlenewsNext

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्याचं मतदान पूर्ण झालं आहे. आता ८ डिसेंबर रोजी निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याच दिवशी गुजरातमध्ये यंदा कुणाची सत्ता येणार याचं चित्र स्पष्ट होईल. सोमवारी गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी एकूण ९३ मतदार संघांसाठी मतदान पार पडलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहमदाबादच्या रानिप येथील निशान शाळेतील मतदान केंद्रावर उपस्थिती लावत मतदानचा हक्क बजावला. मतदानासाठी जात असताना मोदींनी रोड शो केल्याची तक्रार निवडणूक आयोगाला प्राप्त झाली होती. आता निवडणूक आयोगानंही याप्रकरणी मोदींविरोधातील तक्रार दाखल करुन घेतली आहे. 

गुजरात काँग्रेसच्या लॉ सेलचे अध्यक्ष योगेश रवाणी यांनी याबाबत तक्रार केली होती. रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा झेंडा घेऊन भगवा स्कार्फ धारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मतदान करण्यासाठी जात असताना ते राणीप येथील मतदान केंद्रापासून ५००-६०० मीटर अंतरावर मोदी कारमधून खाली उतरले आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांसोबत चालत गेले. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. 

Web Title: Complaint filed by Election Commission against Prime Minister Modi allegation of road show near polling booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.