बँकांविषयी तक्रारींचा पूर
By admin | Published: February 9, 2017 01:38 AM2017-02-09T01:38:49+5:302017-02-09T01:38:49+5:30
बँकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील, तर सामान्य नागरिक तक्रारी वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही, असा सर्वसाधारण समज आहे.
नागपूर : बँकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील, तर सामान्य नागरिक तक्रारी वगैरे करण्याच्या फंदात पडत नाही, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु २०१६ या एकाच वर्षात बँकांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या देशभरातील नागरिकांनी रिझर्व्ह बँकेकडे एक लाखाहून अधिक तक्रारी केल्या. हा आकडा २०१५ मध्ये ९९ हजार ५२९ इतका होता. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बँकांच्या कार्यप्रणाली व सेवेवर नाराज असलेल्या नागरिकांविषयी रिझर्व्ह बँकेकडे दाद मागितली. कुठल्या बँकेविरोधात सर्वाधिक तक्रारी आहेत, या संदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २०१६ मध्ये विविध बँकांविरोधात बँक लोकपाल कार्यालयात १ लाख १२ हजार ५९१ तक्रारी प्राप्त झाल्या. यात राष्ट्रीयीकृत, खासगी, तसेच सहकारी बँकांचा समावेश आहे. देशभरातील १९२ बँकांविरोधात या तक्रारी
आल्या आहेत.