पूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला, IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलचं फर्मान

By admin | Published: April 18, 2017 09:00 PM2017-04-18T21:00:53+5:302017-04-18T21:00:53+5:30

IIT दिल्लीतील एका गर्ल्स होस्टेलने मुलींना ड्रेस कोडच्या नावाखाली पूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करण्याची नोटीस बजावली

Complete body-covered clothes, IIT Delhi Girls Hostel's decree | पूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला, IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलचं फर्मान

पूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला, IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलचं फर्मान

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - संस्कृतीच्या नावाखाली ब-याचदा मुलींना पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा यासाठी कॉलेज आणि शाळेतही पूर्ण अंग झाकणा-या गणवेषाची सक्ती केली जाते. त्याप्रमाणेच IIT दिल्लीतील एका गर्ल्स होस्टेलने मुलींना ड्रेस कोडच्या नावाखाली पूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करण्याची नोटीस बजावली आहे.

या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या हाऊस-डेसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला. या ड्रेस कोडनुसार होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींना या दिवशी अंगभर कपडे असावेत, अशा प्रकारचं नोटीस बजावण्यात आलं आहे. या ड्रेस कोडच्या केलेल्या सक्तीमुळे तीव्र नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावरूनही IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे.  

IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलमध्ये दरवर्षी हाऊस डे साजरा केला जातो. या दिवशी होस्टेलबाहेरील मित्र आणि नातेवाईकांना एका तासासाठी आमंत्रित करण्याची सूट विद्यार्थ्यांना देण्यात येते. यंदाच्या वर्षी 20 एप्रिल हा दिवस हाऊस डेसाठी निवडण्यात आला असून, विद्यार्थिनींसाठी अंगभर कपडे घालण्याचा ड्रेस कोड लागू करण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. IIT दिल्ली गर्ल्स होस्टेलच्या आदेशानुसार पूर्ण अंग झाकेल, असा इंडियन आणि वेस्टर्न ड्रेस घालावा लागणार आहे. ड्रेसबाबत सभ्यतेचे पालन व्हावे, असेही नोटिशीत बजावण्यात आले आहे. IIT दिल्ली हिमाद्री होस्टेलने ड्रेस कोडची सक्ती केली आहे. विद्यार्थिनींना ड्रेस कोडची केलेली सक्ती "पिंजरा तोड ग्रुप"ने सोशल मीडियावर शेअर केली असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. विद्यार्थिनींसाठी ही नोटीस म्हणजे मॉरल पोलिसिंगचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. "विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोड ठरवण्याची एवढी घाई कशासाठी?", असा सवालही या ग्रुपने उपस्थित केला आहे. 

Web Title: Complete body-covered clothes, IIT Delhi Girls Hostel's decree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.