इतवारा हद्दीत संयुक्त पथसंचलन

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:41+5:302014-12-20T22:27:41+5:30

गत ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच इतवारा या संवेदनशील भागात अशा प्रकरणाच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सिंकदराबाद रॅपिड ॲक्शन फोर्स व इतवारा पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी संयुक्तपणे पथसंचलन केले़

Compound path | इतवारा हद्दीत संयुक्त पथसंचलन

इतवारा हद्दीत संयुक्त पथसंचलन

Next
ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तसेच इतवारा या संवेदनशील भागात अशा प्रकरणाच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सिंकदराबाद रॅपिड ॲक्शन फोर्स व इतवारा पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी संयुक्तपणे पथसंचलन केले़
जातीय दंगलीच्या वेळी स्थानिक पोलिसांनी ती दंगल नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागत असल्याने रॅपिड ॲक्शन फोर्सला पाचारण करावे लागते़ तेव्हा रॅपिड ॲक्शन फोर्सला दंगलग्रस्त भागाची ऐतिहासिक, भौगोलिक व सामाजिक परिस्थितीची माहिती नसल्याने त्यांना ऐन दंगलीच्या वेेत तारांबळ उडते़ त्यामुळे या फोर्सला दंगलग्रस्त भागाची माहिती व्हावी या उद्देशाने पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी सिंकदराबाद येथील रॅपिड ॲक्शन फोर्सला नांदेडात पाचारण केले़ या फोर्सला जिल्‘ातील संवेदनशील पोलिस ठाण्यांची माहिती देण्यात येत आहे़ त्याचाच एक भाग म्हणून इतवारा हद्दीत रॅपिड ॲक्शन फोर्स व इतवारा पोलिसांनी संयुक्तपणे पथसंचलन केले़ इतवारा पोलिस ठाणे- हबीब टॉकीज, जुना मोंढा, गंगा कमान, गाडीपूरा, छोटी दर्गा, गौतम नगर, जामा मस्जिद, सराफा, धूत निवास, होळी, नावघाट, करबला, सिद्धार्थ नगर, हतई, मंसूरखॉ हवेली, मंढई, चौफाळा, बिलाल नगर, देगलूर नाका, रझा चौक, साईनगर, शक्तीनगर, केळी मार्केट, इतवारा, भूसार लाईन, बर्की चौक, मन्यार गल्ली, जुना गंज, पैलवान टी हाऊस, विनकर कॉलनी ते चौफाळ्यापर्यंत पथसंचलन करण्यात आले़ चौफाळा येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली़ बैठकीला रॅपिड ॲक्शन फोर्सचे कमांडंट अशोक निगूडे, पोलिस उपाधीक्षक विजय कबाडे, पोलिस निरिक्षक गजानन कंकाळे यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी सपोनि सय्यद, पोउपनि ढाकणे यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी गोविंद कोकुलवार, विशेष शाखेचे बालाजी पोतदार, गुरदीपसिंग, सपोउपनि सरदार, बळीराम राठोड, पानप˜े, पठाण यांनी परिश्रम घेतले़

Web Title: Compound path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.