कागद उद्योगासाठी व्यापक व्यवसाय मंच

By admin | Published: November 3, 2015 02:01 AM2015-11-03T02:01:39+5:302015-11-03T02:01:39+5:30

कागद उद्योगासाठी पेपरेक्स आता एकमेव व्यापक मंच बनलेला आहे. याच कारणांमुळे देशाच्या कागद उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पेपरेक्स व्यवसाय उत्सवाच्या

Comprehensive business platform for the paper industry | कागद उद्योगासाठी व्यापक व्यवसाय मंच

कागद उद्योगासाठी व्यापक व्यवसाय मंच

Next

नवी दिल्ली : कागद उद्योगासाठी पेपरेक्स आता एकमेव व्यापक मंच बनलेला आहे. याच कारणांमुळे देशाच्या कागद उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पेपरेक्स व्यवसाय उत्सवाच्या रूपात स्थापित झालेला आहे, असे प्रतिपादन इंटरनॅशनल ट्रेड एक्झिबिशन इंडियाचे (आयटीई इंडिया) प्रबंध संचालक उडो शुइर्ट्जमन यांनी केले आहे.
उडो शुइर्ट्जमन हे आयटीई आणि अन्य १२ व्यापारी संघटनांतर्फे नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित ‘१२ व्या पेपरेक्स २०१५’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचा शुभारंभ उडो शुइर्ट्जमन यांच्यासोबतच उद्योगपती हर्षपती सिंघानिया आणि गौतम थापर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी अवंता समूहाचे चेअरमन आणि संस्थापक गौतम थापर म्हणाले, ‘प्रदीर्घ काळापासून कागद उद्योग गुंतवणूकदार, तंत्रज्ञान विशेषज्ज्ञ आणि जगाच्या विविध भागांतून व्यापारी वर्गाला आकर्षित करीत आला आहे. या परिवर्तनामुळे अर्थव्यवस्था हवामान बदल आणि वातावरणात सुधारणा होईल. सोबतच सरकार सकारात्मक अर्थव्यवस्था आणि दीर्घकालीन स्थैर्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्पष्ट धोरण तयार करेल, अशी आशा आहे.’
उद्योगपती हर्षपती सिंघानिया म्हणाले, ‘कागद उद्योग कच्च्या मालासाठी एक झाड तोडण्यात आल्याच्या बदल्यात सहा झाडे लावून पर्यावरणाला अनुकूल अशी भूमिका पार पाडत आहे. व्यापारी समुदायासाठी अशाप्रकारचे आयोजन फार महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. कारण यातून विकास, स्थैर्य, समावेश आणि रोजगाराभिमुख वृद्धी व विकास साध्य करण्यात मदत मिळेल. हे प्रदर्शन एसएमई निर्यातदार, गुंतवणूकदार आणि उद्योगपतींसह अन्य सर्व पेपर उद्योगाशी संबंधित घटकांसाठी विश्वसनीय मंच उपलब्ध करून देते.’
या ‘पेपरेक्स २०१५’ प्रदर्शनात इंटरनॅशनल पेपर, ट्रायडेंट, बिल्ट, सेंच्युरी वोईथ, वेलमेट अँड्रिज आणि जेके पेपर यांसारखे नामवंत ब्रॅण्ड भाग घेत आहेत. त्याशिवाय ३३ देशांच्या ५४५ प्रदर्शकांनीही येथे आपापले स्टॉल लावले आहेत. या प्रदर्शनाला ५५ पेक्षा जास्त देशांचे २५ हजार लोक भेट देतील, अशी आशा आहे.

आयटीए प्रदर्शनातून वैश्विक माहिती
आयटीए समूह दरवर्षी पेट्रोलियम खनन, निर्माण सामग्री, पर्यटन यांसह
२० उद्योगांशी संबंधित २५० पेक्षा जास्त प्रदर्शनांचे आयोजन करीत असते. आयटीए समूह जगभरातील ३० कार्यालये आणि एक हजार कर्मचाऱ्यांसोबत आपला व्यवसाय करीत आहे.
अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून वैश्विक विशेष तज्ज्ञता, स्थानिक बाजारपेठेची माहिती आणि ग्राहक सेवेचे उच्च मापदंड याबाबत माहिती पुरविण्यास साहाय्य केले जाते. आयटीए समूहाचे बाजारातील भांडवल ४० कोटी स्टर्लिंग पौंड आहे. हा समूह लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्येही सूचीबद्ध आहे.

Web Title: Comprehensive business platform for the paper industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.