सोनियांविरुद्धच्या खटल्यात तडजोड
By admin | Published: June 11, 2016 06:05 AM2016-06-11T06:05:34+5:302016-06-11T06:05:34+5:30
द्ध राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या बांधकामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड झाली
तिरुवनंतपुरम : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर नेत्यांविरुद्ध राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट स्टडीजच्या बांधकामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड झाली आहे.
ही माहिती न्यायालयालाही देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक व माजी केरळ प्रदेश काँग्रेसचे (केपीसीसी) सरचिटणीस हिदूर मुहम्मद यांनी दिली. सोनिया गांधी यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न हा हितसंबंधातून झाल्याचे मुहम्मद म्हणाले. गांधी या संस्थेच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सदस्यही नाहीत, असे ते म्हणाले.
केरळमधील बांधकाम कंपनीने केरळ प्रदेश काँग्रेस समितीने बांधून घेतलेल्या आरजीआयडीएसच्या बांधकामाचे २.८० कोटी रुपये न मिळाल्याबद्दल काही दिवसांपूर्वी न्यायालयात खटला दाखल केला होता. (वृत्तसंस्था)