सरकारी नोकरी करायचीय? तर ही बातमी नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 06:23 PM2018-03-15T18:23:32+5:302018-03-15T18:23:32+5:30
जर तुम्ही सरकारी नोकरी करायाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
नवी दिल्ली - जर तुम्ही सरकारी नोकरी करायाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण सरकार केंद्रीय आणि राज्यातील नोकरदारांसाठी नवा नियम अंमलात आणण्याच्या विचारात आहे. याचा रिपोर्ट संसदेत पाठवण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, केंद्रात आणि राज्यात सरकारी नोकरी करायची असल्यास प्रत्येकाला पाच वर्ष लष्करात सेवा द्यावी लागणार आहे. संसदिय स्थायी समितीने हा प्रस्ताव सादर केला आहे. सध्या लष्करामध्ये 40 हजार जागा रिक्त आहेत.
संसदिय स्थायी समितीने ठेवलेल्या प्रस्तावामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये गॅजेटेड (राज्यपत्रित) अधिकारी या पदावार डायरेक्ट जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांपर्यंत लष्करात सेवा द्यावी लागणार आहे. रेल्वेमध्ये सध्या 30 लाखांपेक्षा आधिक कर्मचारी काम करत आहेत. त्याचप्रमाणे राज्य आणि केंद्रात इतर ठिकाणी अनेक नोकऱ्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये सरकारी नोकरी करायची असल्यास लष्करात सेवा द्यावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संसदिय स्थायी समितीने आपला रिपोर्ट आज संसदेत सादर केला आहे. या प्रस्तावमध्ये रक्षा मंत्रालय आणि पर्सनल एंड ट्रेनिंग विभागासोबत यावर काम केलं जाणार आहे.