लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:29 PM2024-09-21T16:29:09+5:302024-09-21T16:32:08+5:30

कुशल गौडा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Computer science student arrested for taking video in ladies toilet in Bangalore | लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले

लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले

bengaluru computer science student : बंगळुरुतील एका कॉलेजमधील २१ वर्षीय तरुणाने संतापजनक कृत्य केले. येथील कुंबलगोडूजवळील खासगी कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार घडला. लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावल्याप्रकरणी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. हे प्रकरण उघड होताच विद्यार्थिनींनी रोष व्यक्त केला. कुशल गौडा असे आरोपीचे नाव असून तो चिक्कगोल्लारहट्टी येथील रहिवासी आहे. कुशल लेडीज टॉयलेटमध्ये लपून बसला होता आणि त्याचा मोबाईल फोन शेजारील टॉयलेटच्या भिंतींच्या मधोमध ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले. इथे सात खोल्या असून, त्यामध्ये प्रत्येक भिंतीमध्ये अंतर आहे.

एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी आरोपी कुशलला रंगेहाथ पकडण्यात आले. टॉयलेटमध्ये गेलेल्या एका मुलीने भिंतीच्या मधोमध ठेवलेला मोबाईल पाहिला आणि तिला गजर ऐकू आला. ती पटकन बाहेर आली आणि तिने टॉयलेटला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर इतरांनी येऊन कुशलला बाहेर ओढून मुख्याध्यापकांच्या दालनात नेले. कॉलेज व्यवस्थापनाकडून तक्रार आल्यानंतर आम्ही त्याला अटक केली आणि मोबाइल फोन जप्त केला. 

आरोपी रंगेहाथ सापडला
दरम्यान, कुशलचा फोन तपासला असता जवळपास १५ मिनिटे त्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच संबंधित मुलीला सकाळी १०.४५ च्या सुमारास गजर ऐकू आला. म्हणजेच सकाळी १०.३० च्या सुमारास त्याने टॉयलेटमध्ये प्रवेश केला आणि मोबाईल ठेवला. महिलांच्या शौचालयाजवळ बसवलेले सीसीटीव्ही काम करत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी अनेक दिवसांपासून हे कृत्य करत होता. तो चोरुन व्हिडीओ काढत असे. जेव्हा त्याला एका विद्यार्थिनीने रंगेहाथ पकडले तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचा फोन तपासला असता त्यामध्ये सात-आठ व्हिडीओ सापडल्या. विद्यार्थिनींनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Computer science student arrested for taking video in ladies toilet in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.