पनवेलमधील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण

By admin | Published: July 7, 2015 10:55 PM2015-07-07T22:55:11+5:302015-07-07T22:55:11+5:30

निविदा प्रक्रिया सुरू : एमएमआयडीए पुरवणार निधी

Concretization of main roads in Panvel | पनवेलमधील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण

पनवेलमधील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण

Next
विदा प्रक्रिया सुरू : एमएमआयडीए पुरवणार निधी
पनवेल : पनवेल शहरातील मुख्य पाच रस्त्यांचे काँक्र ीटीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याकरिता एमएमआरडीए निधी पुरवणार असून त्यासाठीच्या निविदा प्रसिध्द झाल्या आहेत. गणेशोत्सवानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबई - पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पनवेल शहराचा विविध प्रकल्प आणि वाढत्या नागरीकरणामुळे झपाट्याने कायापालट होत आहे. मात्र रस्त्यांची अवस्था अजूनही बिकट आहे. सखल भागात पावसाळ्यात पाणी साचत आहे, तर काही ठिकाणी खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. एमटीएनएल रस्त्याचे क ाँक्रीटीकरण केल्यानंतर आता इतरही पाच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे.
नगरपालिकेकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली असून सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. शिवाजी चौक ते पंचरत्न हॉटेल मार्गाच्या काँक्र ीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्याचबरोबर ठाणा नाका रोडचे काँक्रीटीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे. पनवेल नगरपालिकेने खास रस्ते विकास प्रकल्प तयार केला आहे. याकरिता निधी मिळावा म्हणून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याकरिता ९९.0५ कोटींचा आराखडा पालिकेने तयार केला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तपासणीत हा आकडा १0३.६९वर पोहचला आहे. त्यानुसार सा. बां. विभागाने 0.२५ टक्के तांत्रिक मूल्यांकनाचे शुल्क भरण्याचे नगरपालिका संचालनालयाला कळवले आहे. इतकेच काय हा प्रस्ताव सा. बां. विभागाने तांत्रिक अभिप्रायही नोंदवला आहे. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर इतर उर्वरित रस्त्यांचे काम सुध्दा मार्गी लागणार आहे.
...
एमएमआरडीएने दिला निधी
ठाणा नाका रोड, उरण रोड, उरण नाका ते टपाल नाका, कर्नाळा सर्कल- शिवाजी चौक- आंबेडकर पुतळा, कर्नाळा सर्कल -कर्मवीर भाऊराव पुतळा- शिवाजी चौक या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याकरिता ४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये नगरपालिका १0 टक्के म्हणजे ४.५0 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे प्रभारी शहर अभियंता संजय कटेकर यांनी सांगितले.
...
कर्नाळा सर्कल ते कर्मवीर पुतळा ते शिवाजी चौक या रस्त्याचा खर्च पाच कोटींच्या आतमध्ये असल्याने त्याची निविदा पनवेल नगरपालिकेने प्रसिध्द केली आहे. उर्वरित रस्त्यांकरिता एमएमआरडीएने निविदा प्रक्रि या सुरू केली आहे. एजन्सी नियुक्त झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.
- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल

Web Title: Concretization of main roads in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.