इंदिरानगर येथील पावसाळी नाल्यावर काँक्रिटीकरण
By admin | Published: December 8, 2015 12:01 AM2015-12-08T00:01:43+5:302015-12-08T00:01:56+5:30
इंदिरानगर : येथील गजानन महाराज मंदिर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंतच्या पावसाळी उघड्या नाल्यावर सीमेंट काँक्रीट स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. त्यामुळे येथील परिसर घाण व दुर्गंधीपासून मुक्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सुमारे ४० वर्षांपूर्वीपासून राजीवनगर झोपडपी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, आदर्श कॉलनी, स्टेट बँक कॉलनीसह विविध कॉलनी आणि सोसायटीतून नैसर्गिक नाला गेला आहे. परंतु दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्यापासून दुतर्फा वाहत नागरिकांच्या घरात शिरायचे. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होत असे. त्याची दखल घेत महापालिकेने सुमारे सहा वर्षांपूर्वी पेठेनगर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंत सीमेंट काँक्रीटीकरणाचा पावसाळी नाला बांधला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु काही दिवसांतच पावसाळी नाल्यात राजीवनगर झोपडपी लगतच गटारीचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाल्यालगत राहणार्या रहिवाशांना घाण व दुर्गंधीमुळे घराचे दारे व खिडक्या उघडणेसुद्धा मुश्किल झाले होते. घाण व दुर्गंधीमुळे साथीच्या आजाराची लागण होत असे. प्रभागाचे नगरसेवक दीपाली कुलकर्णी व यशवंत निकुळे यांनी पाठपुरावा करत अखेर पावसाळी नाल्यावर स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ केला. (वार्ताहर)