हल्ल्याची भारताकडून निंदा

By Admin | Published: December 17, 2014 02:25 AM2014-12-17T02:25:41+5:302014-12-17T02:25:41+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निष्पापांचा जीव घेणारा भ्याड हल्ला, अशा शब्दांत या हल्ल्याचा निषेध केला आहे़

Condemnating India's condemnation | हल्ल्याची भारताकडून निंदा

हल्ल्याची भारताकडून निंदा

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निष्पापांचा जीव घेणारा भ्याड हल्ला, अशा शब्दांत या हल्ल्याचा निषेध केला आहे़ या हल्ल्यात आपल्या आप्तांना गमावलेल्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया मोदींनी टिष्ट्वटरवर नोंदवली आहे़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे़ मानवतेविरुद्धचा हा हल्ला अतिरेक्यांकडून संपूर्ण जगाला असलेला खरा धोका दर्शवतो, असे त्यांनी म्हटले आहे़ पेशावर येथील सैनिकी शाळेवरील अतिरेकी हल्ल्याबद्दलचे दु:ख आणि वेदना व्यक्त करायला आमच्याजवळ शब्द नाही़ अतिरेक्यांचे हे कृत्य केवळ निष्पाप बालकांचे नाही तर मानवतेची हत्या करणारे भ्याड कृत्य आहे़, असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले.

Web Title: Condemnating India's condemnation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.