रॅगिंगला बळी पडलेल्या दलित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर
By admin | Published: June 22, 2016 05:50 PM2016-06-22T17:50:40+5:302016-06-22T18:17:40+5:30
येथील एका १९ वर्षीय दलित विद्यार्थिनी रॅगिंगला बळी पडल्याची घटना घडली असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात अति दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
केरळ.दि. २२ - येथील एका १९ वर्षीय दलित विद्यार्थिनी रॅगिंगला बळी पडल्याची घटना घडली असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात अति दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अस्वाथी असे या दलित विद्यार्थीनीचे नाव असून ती गुलबर्गा येथील नर्सिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ती शिकत होती. यावेळी याच कॉलेजच्या दुस-या वर्षातील आठ मुलींनी तिच्यावर रॅगिंग केले. तिला बळजबरीने शौचालय साफ करण्यास वापरण्यात येणारे शौचालय क्लिनर प्यायला लावले. यामुळे तिची प्रकृती ढासळल्यानंतर कॉलेजच्या प्रशासनाने तिला घरी पाठविले. ही घटना गेल्या महिन्याच्या नऊ तारखेला घडली.
अस्वाथी घरी घेल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले, असता डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले, कारण तिच्या पोटातील काही भागांना इजा पोहचली आहे. सध्या तिला रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
अस्वाथी ही गरीब घरची असून तिने शिक्षणासाठी कर्ज काढून कॉलेजला प्रवेश घेतला होता. याचबरोबर तिच्या काकानी तिच्यावर कॉलेजमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून रँगिग होत असल्याचा दावा केला आहे. तर अस्वाथीच्या आईने मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे रॅगिंग करणा-यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.