फिट येऊन पडल्याने तरुणाची मान कापली प्रकृती चिंताजनक : गोलाणी मार्केटमधील फायनान्स कार्यालयातील घटना
By Admin | Published: February 11, 2016 10:59 PM2016-02-11T22:59:39+5:302016-02-11T22:59:39+5:30
जळगाव: कार्यालयात दैनंदिन काम करत असताना फिट आल्याने कॅबीनवर कोसळल्याने वसंत जयवंत सुरळकर (वय २८ रा.कुंभारी खुर्द ता.जामनेर) या तरुणाची काच घुसून मान कापली गेली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील श्री स्वामी समर्थ फायनान्स या कार्यालयात घडली. त्याला तातडीने इंडो अमेरिकन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ज गाव: कार्यालयात दैनंदिन काम करत असताना फिट आल्याने कॅबीनवर कोसळल्याने वसंत जयवंत सुरळकर (वय २८ रा.कुंभारी खुर्द ता.जामनेर) या तरुणाची काच घुसून मान कापली गेली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील श्री स्वामी समर्थ फायनान्स या कार्यालयात घडली. त्याला तातडीने इंडो अमेरिकन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुरळकर हा फायनान्स कार्यालयात वसुली अधिकारी म्हणून नोकरीला आहे. नवीन बसस्थानकाजवळ मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत तो वास्तव्याला आहे. सकाळी अकरा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दुसर्या मजल्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ फायनान्स या त्याच्या कार्यालयात आला होता. कामानिमित्त कार्यालयात उभा असताना अचानक त्याला फिट आले.प्रचंड रक्तस्त्राववसंत याची काच घसून मान कापली गेल्याने मानेतून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. ही घटना पाहून कार्यालयातील सहकार्यांमध्ये प्रचंड थरकाप उडाला. सेल्स मॅनेजर चंद्रकांत वारके, जितेंद्र पाटील, नंदकिशोर सोनवणे व धनराज पाटील यांनी त्याला तातडीने शेजारीच असलेल्या इंडो अमेरिकन रुग्णालयात दाखल केले. त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.पोलिसांची भेटअपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नलनाथ तांबे, सहायक निरीक्षक रोही यांनी रुग्णालयात जखमीची भेट घेतली, परंतु तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने जबाब घेता आला नाही. तांबे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कार्यालयातील सहकार्यांनी वसंत याच्या जळगावातील बहिणीला फोन करून बोलावून घेतले. यापूर्वीही घडली होती अशीच घटनायापूर्वीही चार जानेवारी रोजी त्याला अशाच प्रकारचे फिट आले होते, तेव्हा तो भींतीवर कोसळला होता. त्यावेळीही त्याला सहकार्यांनी याच रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या आजारावर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. सेल्स मॅनेजर चंद्रकांत वारके यांनी औषधीसाठी त्याला दोन दिवसापूर्वी साडेपाचशे रुपये दिले होते.