गोपनीय माहितीला प्रसिद्धी नाही!

By admin | Published: August 31, 2016 04:14 AM2016-08-31T04:14:25+5:302016-08-31T04:14:25+5:30

भारतीय नौदल वापरत असलेल्या स्कॉर्पिन पाणबुड्यांशी संबंधित आणखी गोपनीय माहिती प्रसिद्ध करणार नाही, असे ‘द आॅस्ट्रेलियन’ या दैनिकाने मंगळवारी म्हटले

Confidential information is not publicity! | गोपनीय माहितीला प्रसिद्धी नाही!

गोपनीय माहितीला प्रसिद्धी नाही!

Next

मेलबोर्न : भारतीय नौदल वापरत असलेल्या स्कॉर्पिन पाणबुड्यांशी संबंधित आणखी गोपनीय माहिती प्रसिद्ध करणार नाही, असे ‘द आॅस्ट्रेलियन’ या दैनिकाने मंगळवारी म्हटले. न्यू साऊथ वेल्स सर्वोच्च न्यायालयाने या दैनिकाला अशी माहिती प्रसिद्ध करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.
या न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशात दैनिकाने संकेतस्थळावरून दस्तावेज काढून टाकावा, असे म्हटले. ‘द आॅस्ट्रेलियन’ने याआधीच संकेतस्थळावरून सुरक्षेशी संबंधित संवेदनशील असा मजकूर प्रकाशित केलेला आहे. संरक्षणाशी संबंधित सेवा देणाऱ्या डीसीएनएस या फ्रेंच कंपनीला स्कॉर्पिनशी संबंधित दस्तावेज बुधवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत परत करण्यासही न्यायालयाने सांगितले. ‘द आॅस्ट्रेलियन’ने संवेदनशील मजकूर प्रसिद्ध करू नये अशी मागणी डीसीएनएसने शपथपत्राद्वारे न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले.
‘द आॅस्ट्रेलियन’ला स्कॉर्पिनची फुटलेली गोपनीय माहिती प्रसिद्ध न करण्याच्या आदेशाची मुदत एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपते. त्यानंतर गुरुवारीच या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होईल. डीसीएनएसने आपल्या शपथपत्रात म्हटले आहे
की, दस्तावेज उघड झाल्यामुळे आमच्या स्पर्धकांना तो उपलब्ध झाल्यामुळे आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. अत्यंत गोपनीय माहिती फुटल्यामुळे डीसीएनएस कंपनीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा तडा गेला. (वृत्तसंस्था)

Web Title: Confidential information is not publicity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.