संवादातून मिटावेत वाद
By admin | Published: August 28, 2015 11:37 PM2015-08-28T23:37:21+5:302015-08-28T23:37:21+5:30
माधवी वैद्य : संमेलन कार्यालयाचे पिंपरीत उद्घाटन
Next
म धवी वैद्य : संमेलन कार्यालयाचे पिंपरीत उद्घाटनपिंपरी : मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी कॉर्पोरेट जगताशी आणि आधुनिकतेशी सांगड घालण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पिंपरीत शुक्रवारी व्यक्त केले. महाराष्ट्रीय लोकांना वाद घालण्याची सवय आहे. संमेलनात वाद व्हावेत. मात्र, संवादातून वाद मिटावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठास ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. वैद्य बोलत होत्या. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, साहित्य महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, विद्यापीठ सोसायटीचे सदस्य सोमनाथ पाटील, सचिन व्हटकर, मसाप पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, देहूगाव शाखचे अध्यक्ष दत्तात्रय अत्रे आदी उपस्थित होते.डॉ. वैद्य म्हणाल्या, 'स्वप्ने पाहण्याची आणि ती शंभर टक्के पूर्ण करण्याची क्षमता डॉ. पाटील यांच्यात आहे. मराठीला ज्ञानभाषा होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत आणि हे स्वप्न आता पूर्णत्वास जात असल्याचे पिंपरीत होणार्या संमेलनावरून दिसून येत आहे. घरातील तोरणावरून घरातील संस्कार कळतात. येथील संमेलनाचे कार्यालय पाहिले की, येथील संमेलन देखणे होणार, याची कल्पना येते. संमेलन फलदायी होण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत.'डॉ. मोरे म्हणाले, 'माझा घुमान आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही संमेलनांशी संबंध येणार आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या दोन्ही गावांनी महाराष्ट्राची संस्कृती घडविली आहे. या भूमीला वेगळे भारलेपण आहे. अशा संतभूमी आणि यंत्रभूमीत संमेलन भरविण्याची संधी शिक्षणाची सेवा करणार्या विद्यापीठास मिळाली आहे.' (प्रतिनिधी)