सोनियांच्या आक्षेपार्ह छायाचित्रावरून संघर्ष
By admin | Published: June 17, 2016 02:45 AM2016-06-17T02:45:35+5:302016-06-17T02:45:57+5:30
एका व्हॉटस्-अॅप ग्रुपवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्यावरून गुरुवारी दोन गटांत हिंसक संघर्ष झाला. यात एक ठार, तर सहा जण जखमी झाले.
जबलपूर (मध्यप्रदेश) : एका व्हॉटस्-अॅप ग्रुपवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्यावरून गुरुवारी दोन गटांत हिंसक संघर्ष झाला. यात एक ठार, तर सहा जण जखमी झाले. पाच जखमींची प्रकृती गंभीर आहे.
हाणामारीत जखमी झालेल्या उमेश वर्मा या व्यक्तीचा येथील एका रुग्णालयात मृत्यू झाला, असे पोलीस अधीक्षक इंद्रजित बलसावर यांनी सांगितले. सोनिया गांधींचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याबाबत आम्ही तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर विरोधी गटाने पोलीस ठाण्यात चाकूने हल्ला केला, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक जतीन राज यांच्या गटाने केला. तथापि, पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. राज यांनी आपल्या भागातील लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉटस्-अॅपवर विजयनगर फ्रेंडस् नावाचा ग्रुप बनवला होता. प्रशांत नायक याने या ग्रुपवर सोनिया गांधी यांचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकून खाली पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षांची अशी स्थिती केल्याचे विडंबनात्मक पद्धतीने लिहिले होते. (वृत्तसंस्था)