चळवळीतल्या महिलांचा संघर्ष अंतर्मुख करणारा (पॅकेज ३)
By admin | Published: December 28, 2014 11:40 PM2014-12-28T23:40:20+5:302014-12-28T23:40:20+5:30
सामाजिक कार्य करताना अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. एखादे काम करणे म्हणजे समाजाच्या प्रचलित व्यवस्थेविरुद्धही जाण्याचीही हिंमत ठेवण्याचे असते. अशा वेळी लोक हसतात, अपमान करतात आणि वेड्यातही काढतात. पण आपल्या विचारांवर आणि कामावर श्रद्धा असली तर आपण जगातील कुठलेही काम यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. आपण स्त्री आहोत म्हणून आपण काहीही करू शकत नाही, असे तर अजिबातच नाही. यापेक्षा आपण स्त्री आहोत म्हणूनच आपण खूप मोठे काम उभे करू शकतो, असा विश्वास यावेळी अनुभव कथनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला.
Next
स माजिक कार्य करताना अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. एखादे काम करणे म्हणजे समाजाच्या प्रचलित व्यवस्थेविरुद्धही जाण्याचीही हिंमत ठेवण्याचे असते. अशा वेळी लोक हसतात, अपमान करतात आणि वेड्यातही काढतात. पण आपल्या विचारांवर आणि कामावर श्रद्धा असली तर आपण जगातील कुठलेही काम यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. आपण स्त्री आहोत म्हणून आपण काहीही करू शकत नाही, असे तर अजिबातच नाही. यापेक्षा आपण स्त्री आहोत म्हणूनच आपण खूप मोठे काम उभे करू शकतो, असा विश्वास यावेळी अनुभव कथनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी व्यक्त केला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी शैल जैमिनी तर वक्त्या म्हणून डॉ. संध्या पवार, छाया खोब्रागडे, माधुरी साकुळकर, सुजाता भोंगाडे उपस्थित होत्या. याप्रसंगी माधुरी साकुळकर यांनी स्त्री शक्तीचे काम करताना आलेले अनुभव आणि संघर्ष मांडला. डॉ. संध्या पवार यांनी त्यांना आलेले अनेक अनुभव सांगितले. मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारताना आणि या अनुषंगाने आलेल्या अडचणींच्या काळात पतीनेही दिलेली साथ त्यांनी सांगितली. छाया खोब्रागडे यांनी लोक मूर्खात काढतात तेव्हा काम सोडून द्यायचे नसते तर अधिक जोमाने कामाला लागायचे असते, असे सांगितले. याप्रसंगी सुजाता भोंगाडे यांनीही अनुभवकथन केले. शैल जैमिनी यांनी त्यांचा संघर्ष सांगितला. संचालन डॉ. छाया कावळे यांनी केले.