'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 07:32 PM2024-10-15T19:32:47+5:302024-10-15T19:40:41+5:30

CEC Rajiv Kumar questioned exit polls: 'चुकीच्या एक्झिट पोलमुळे निकालांबाबत मतदारांमध्ये असंतोष निर्माण होतो.'

'Confusion and wrong expectations among people due to exit polls' Election Commissioner's question to the media | 'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला

'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला

CEC Rajiv Kumar questioned exit polls: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज(15 ऑक्टोबर 2024) अखेर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यादरम्यान, केंद्रीय निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी माध्यमांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या एक्झिट पोलवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 'एक्झिट पोल लोकांमध्ये गोंधळ आणि चुकीच्या अपेक्षा निर्माण करत आहेत. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होतो,' असे ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्यांचे विधान आले.

मुख्य निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
राजीव कुमार यांनी प्रसार माध्यमांना या मुद्द्यावर आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, "एक्झिट पोल दाखवताना सॅम्पल साइज काय होता, सर्वेक्षण कुठे केले गेले, निकाल कसे आले आणि निकाल जुळले नाहीत, तर जबाबदार कोण? याचा खुलासा व्हायला हवा. एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो आणि त्यांच्या अपेक्षा वाढतात. यामुळेच मतमोजणीनंतर निकालांबाबत मतदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे."

"निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्या काही तासांत, न जुळणारा डेटा समोर येतो, जो मतदारांसाठी गोंधळात टाकणारा आहे. मतमोजणी मतदानानंतर सुमारे तीन दिवसांनी होते आणि त्याच दिवशी 6 वाजता निकालाविषयी अटकळ सुरू होते, परंतु ती कोणत्याही वैज्ञानिक आधारावर केली जात नाही. यावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे उपाययोजना आहेत, ज्या माध्यमांनी स्वीकारण्याची वेळ नक्कीच आली आहे", असेही ते म्हणाले.

राजीव कुमार पुढे म्हणतात, "जेव्हा मतमोजणी सुरू होते, तेव्हा 8.05-8.10 च्या सुमारास निकाल (टीव्हीवर) येऊ लागतात. हे मूर्खपणाचे आहे. ईव्हीएमची पहिली मतमोजणी 8.30 वाजता सुरू होते. आम्ही 9.30 च्या सुमारास निकाल पोस्ट करणे सुरू करतो, त्यामुळे जेव्हा वास्तविक परिणाम येऊ लागतात, तेव्हा या विसंगतीमुळे काहीवेळा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात." यावेळी त्यांनी निवडणूक निकाल, एक्झिट पोलचे स्वरूप आणि त्याच्या परिणामावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.

'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका

Web Title: 'Confusion and wrong expectations among people due to exit polls' Election Commissioner's question to the media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.