राज्यसभेत गोंधळ : काँग्रेस-भाजपा सदस्य आमनेसामने
By admin | Published: April 28, 2016 01:25 AM2016-04-28T01:25:46+5:302016-04-28T04:50:59+5:30
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी सोनिया गांधी यांचा संबंध असल्याचा आरोप केल्यावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला.
नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याशी सोनिया गांधी यांचा संबंध असल्याचा आरोप केल्यावरून राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली सुब्रमण्यम स्वामी हे सीआयएचे हस्तक असल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी करताच भाजपचे सदस्यही संतापले. दोनी बाजूच्या सदस्यांना शांत करण्यात अपशय आल्याने सभापतींना कामकाज तहकूब करावे लागले.
‘या हेलिकॉप्टर घोटाळ्याशी आपला संबंध नाही. कुणी आपले नाव घेत असेल तर घेऊ द्या, मी अजिबात घाबरत नाही,’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले असून, हा चारित्र्यहननाचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.
भाजपाचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधींचे नाव घेताच काँग्रेस
सदस्य संतप्त झाले. यावेळी काही
सदस्य हातवारे करीत सत्तारूढ सदस्यांकडे धावून गेले, पण लगेच मार्शल्सना बोलावण्यात आले. मार्शल्स सत्तारूढ बाकाजवळ उभे झाल्याने काँग्रेस सदस्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. या गोंधळात सभापती हामिद अंसारी यांनी कामकाज तहकूब केले.
>सोनिया गांधींनी आरोप फेटाळले
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात देण्यात आलेल्या लाचेशी आपला आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचा संबंध असल्याचा भाजपाने केलेला आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. ‘हे सर्व आरोप निराधार आहेत आणि माझे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणाला माझे नाव घ्यायचे असेल तर घेऊ द्या. पण मी कुणालाही घाबरत नाही,’ असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या, मागील दोन वर्षांपासून सत्तेवर असताना तुम्ही काय केले, ते आधी सांगा. माझ्यावरील आरोप निराधार आणि धादांत खोटे आहेत. त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही. पुरावे नसताना खोटे आरोप केले जात आहेत.
>लोकसभेत चर्चेची काँग्रेसची मागणी
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यावर लोकसभेत चर्चा करण्यात यावी, अशी मागणीलोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ही मागणी केली. पण सत्ताधारी सदस्यांनी एअरसेल-मॅक्सिस वादाचा विषय काढून हेलिकॉप्टर सौद्यावर चर्चा होउ दिली नाही.
च्कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर कुरियन यांनी सोनिया गांधींचे नाव कामकाजातून वगळण्याची सूचना केली. जो सदस्य सभागृहात येऊन आपली बाजू मांडू शकत नाही त्या सदस्याचे नाव घेऊ नका. सोनिया गांधी या लोकसभेच्या सदस्य आहेत, असे कुरियन म्हणाले. परंतु काँग्रेस सदस्यांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी स्वामींच्या विरोधात घोषणा देणे सुरूच ठेवले.