पक्ष वाढविणे हीच मुंडे यांना आदरांजली : मिरगणे
By admin | Published: December 13, 2015 12:07 AM2015-12-13T00:07:37+5:302015-12-13T00:07:37+5:30
बार्शी : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता आणणे हे त्यांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी भाजपला वाढविणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी केले.
Next
ब र्शी : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता आणणे हे त्यांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी भाजपला वाढविणे हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा महासंपर्क अभियान प्रमुख राजेंद्र मिरगणे यांनी केले. ते गोपीनाथ मुंडे यांच्या 66 व्या जयंतीनिमित्त भाजप संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते. प्रारंभी राजेंद्र मिरगणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांनी हा पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी जसे प्रयत्न केले त्याप्रमाणे येत्या चार वषाणत बार्शी भाजपमय करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून त्यांचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन मिरगणे यांनी केले. यावेळी धाराशिव शिवसेनेचे जि. प. सदस्य दत्ता साळुंखे, ज्येष्ठ नेते छोटूभाऊ लोहे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, महिला आघाडीच्या पद्मजा काळे, रामराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास अँड. प्रकाश गुंड, संभाजी सोनवणे, आश्विन गाढवे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.