विजयासाठी मोदींचं राहुल गांधींनी केलं अभिनंदन, मोदींनी दिलं प्रत्युत्तर
By admin | Published: March 11, 2017 07:09 PM2017-03-11T19:09:18+5:302017-03-11T19:20:19+5:30
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं मिळवलेल्या न भूतो न भविष्यती अशा यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं मिळवलेल्या न भूतो न भविष्यती अशा यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. शुभेच्छांबद्दल धन्यवाद, लोकशाही जिंदाबाद, असं नरेंद्र मोदी रिट्विट केले आहे.
दरम्यान राहुल गांधींनी पंजाबमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल कॅप्टन अमरिंदर सिंह यांचंही अभिनंदन केलं आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने अकाली दल-भाजपचा पराभव करत दणदणीत यश मिळवलं आहे. देशातील जनतेचं मन जिंकत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष कायम राहील, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
पंजाबच्या 117 जागांपैकी 77 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेस पंजाबमध्ये नंबर 1चा पक्ष ठरला आहे. आम आदमी पार्टीला 22 जागा मिळवता आल्यात आहेत. तर अकाली दल आणि भाजपा युतीला अवघ्या 18 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यातील भाजपाला फक्त 3च जागा जिंकता आल्या आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला असून, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरीत्या पार केला आहे.