राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून सोनियांना शुभेच्छा
By Admin | Published: December 9, 2015 11:23 PM2015-12-09T23:23:50+5:302015-12-09T23:23:50+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सार्वजनिक जीवनातील सर्व क्षेत्रांत आपण अपूर्व योगदान दिले आहे. भविष्यातही आपल्या हातून अशीच दीर्घकाळ देशसेवा घडो. यासाठी परमेश्वर आपणास दीर्घायुष्य देवो, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनीही सकाळी टिष्ट्वटरवरून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, असे टिष्ट्वट त्यांनी केले.