अभिनंदन ! युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत 2 भारतीय वास्तूंची निवड, तुकाराम मुंढेंनी व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:01 PM2021-07-27T21:01:48+5:302021-07-27T21:41:03+5:30
गुजरातमधील हडप्पा कालीन संस्कृतीचे धोलावीरा आणि तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच (रामप्पा मंदिर) या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेड लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे.
नवी दिल्ली - युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज लिस्टमध्ये भारतातील आणखी दोन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचा समावेश झाला आहे. सरकारने 2019 च्या युनेस्कोच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी तेलंगणातील रामप्पा मंदिराचे नामांकन दिले होते. युनेस्कोच्या वर्ल्डे हिरेटेज लीस्ट समितीच्या 44 व्या सत्रातील बैठकीत 25 जुलै रोजी रामप्पा मंदिराला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, आज 27 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीत गुजरातमधील धोलावीरा या ऐतिहासिक ठिकाणालाही स्थान देण्यात आले आहे.
गुजरातमधील हडप्पा कालीन संस्कृतीचे धोलावीरा आणि तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर म्हणजेच (रामप्पा मंदिर) या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेड लिस्टमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे, युनेस्कोच्या यादीत आता देशातील 40 ऐतिहासिक वास्तूंचा समावेश झाला आहे. त्यामध्ये 32 वास्तू सांस्कृतिक असून 7 नैसर्गिक ठिकाणं आहेत. तर, 1 संमिश्र असे स्थळ आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही भारतातील आणखी दोन वास्तूंचा या यादीत समावेश झाल्याबद्दल भारतीयांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुंढेंनी या वास्तूंचे फोटोही शेअर केले आहेत.
Congratulations 🇮🇳.Two new Indian sites on UNESCO World Heritage List
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) July 27, 2021
Kakatiya Rudreshwara (Ramappa) Temple and Dholavira: A Harrapan City , bringing India’s number of World Heritage sites to 40.#UNESCOpic.twitter.com/ZTZmc89PN0
युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज यादीत महाराष्ट्रातील 4 ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये, अजेंठा आणि वेरुळच्या लेण्या, एलिफंटा लेणी व मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजा टर्मिनल्स या 4 ऐतिहासिक वास्तूंना स्थान आहे.