अरुणाचलमध्ये पुन्हा काँग्रेस; पेमा खांडू यांनी केले बहुमत सिध्द
By admin | Published: July 20, 2016 06:25 PM2016-07-20T18:25:19+5:302016-07-20T18:26:55+5:30
अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चोवना मेइन यांच्या नेतृत्वात काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आले आहे.
ऑनलाइन लोकमत
इटानगर, दि. २० : अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चोवना मेइन यांच्या नेतृत्वात काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आले आहे. विधानसभेत काँग्रेसला ४६ आमदारांचा पाठिंबा मिळल्याने बहुमत सिद्ध करण्यास यश आले आहे. पेमा खांडू यांनी रविवारी देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली होती. सरकार टिकविण्यासाठी त्यांना बहुमत सिध्द करणे आवश्यक होते. यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने याबाबत घेतलेले निर्णय घटनाबाह्य ठरवले होते.
पूर्वोत्तरच्या या राज्याचे खांडू नववे मुख्यमंत्री आहेत. या दोन्ही नेत्यांना राज्यपाल तथागत राय यांनी राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दोरजी खांडू यांचा एका विमान अपघातात २०११ मध्ये मृत्यू झाला होता. राय हे त्रिपुराचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे अरुणाचलचा अतिरिक्त कार्यभार आहे. अरुणाचलमधील नाट्यमय राजकीय घडामोडीत शनिवारी काँगे्रसने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पेमा खांडू यांची नेतेपदी निवड केली होती.
पेमा खांडू (३७) हे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या प्रतिष्ठित हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतलेली आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर ते तरुणपणीच राजकारणात सक्रीय झाले होते. तवांग येथील रहिवाशी असलेल्या पेमा यांनी वडीलांच्या मृत्यूनंतर २०११ मध्ये प्रथम अरुणाचल विधानसभेत प्रवेश केला. आमदार म्हणून ते बिनविरोध निवडून आले होते.