शेतकऱ्यांना पळपुटे संबोधण्यावरून काँग्रेस आक्रमक

By admin | Published: May 1, 2015 01:46 AM2015-05-01T01:46:13+5:302015-05-01T01:46:13+5:30

हरियाणाच्या मंत्र्याविरुद्ध पंतप्रधान काय कारवाई करणार? असा सवाल करीत काँग्रेसने गुरुवारी या मुद्यावर सरकारला राज्यसभेत धारेवर धरले.

Congress aggressor calling for farmers a runaway address | शेतकऱ्यांना पळपुटे संबोधण्यावरून काँग्रेस आक्रमक

शेतकऱ्यांना पळपुटे संबोधण्यावरून काँग्रेस आक्रमक

Next

सरकारला सवाल : पंतप्रधान काय कारवाई करणार; भाजप मंत्र्यांच्या वक्तव्याने वाद
नवी दिल्ली : आत्महत्या करणारे शेतकरी पळपुटे असतात, असे म्हणत संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या हरियाणाच्या मंत्र्याविरुद्ध पंतप्रधान काय कारवाई करणार? असा सवाल करीत काँग्रेसने गुरुवारी या मुद्यावर सरकारला राज्यसभेत धारेवर धरले.
शून्यप्रहरादरम्यान काँगे्रसचे आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित करीत, भाजपशासित हरियाणा सरकारच्या कृषिमंत्र्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना पळपुटे संबोधणे गंभीर असल्याचे म्हटले. पंतप्रधान या प्रकरणी काय कारवाई करणार? असा सवाल त्यांनी केला.
सत्ताधारी भाजप सदस्यांनी शर्मा यांना विरोध दर्शवला. राज्य सरकार, राज्य सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसंदर्भात या सभागृहात चर्चा होऊ शकत नाही.
हे नियमांविरुद्ध असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. उपसभापती पी.जे. कुरियन यांनीही राज्य सरकारे आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगितले.
आत्महत्या करणारे शेतकरी पळपुटे आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री आणि भाजपच्या शेतकरी मंचचे माजी अध्यक्ष ओ.पी. धनकर यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

४सभागृहाबाहेर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उचलण्यात आलेल्या पावलांची घोषणा करण्याचा मुद्दा समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी शून्यप्रहरादरम्यान राज्यसभेत लावून धरला. या सभागृहात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तीन दिवस चर्चा झाली. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच्या कुठल्याही उपाययोजनेचा उल्लेख केला नाही.

४विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा गंभीर मुद्दा असल्याचे म्हटले. यानंतर अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बुधवारी सकाळी मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते. लोकसभेत या निर्णयांची घोषणा केली. त्यानंतरच सभागृहाबाहेर मीडियाला याबाबतची माहिती दिली.

Web Title: Congress aggressor calling for farmers a runaway address

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.