काँग्रेस मेलेल्या माणसांवरूनही राजकारण करतोय; सुषमा स्वराज यांची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 04:36 PM2018-03-20T16:36:57+5:302018-03-20T17:14:53+5:30
राज्यसभेत निवेदन देण्यासाठी गेलेल्या सुषमा स्वराज यांना काँग्रेसच्या विरोधाचा सामना करावा लागला.
नवी दिल्ली: इराकमध्ये असताना आयसिसने अपहरण केलेल्या 39 भारतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. मात्र, त्यानंतर लोकसभेत निवेदन देण्यासाठी गेलेल्या सुषमा स्वराज यांना काँग्रेसच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे सुषमा स्वराज चांगल्याच संतापल्या. काँग्रेस लोकांच्या मृत्यूचेही राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यसभेत मी बोलत असताना प्रत्येकाने शांतपणे माझे म्हणणे ऐकून घेतले. लोकसभेतही असचे होईल, असे मला वाटत होते. परंतु, मी तेथे गेल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने घोषणा देऊन गोंधळ माजवायला सुरूवात केली. हा प्रकार खूपच दुर्देवी होता. काँग्रेसचे हे राजकारण अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. राज्यसभेत मी बोलत असताना थोडाही गोंधळ कसा झाला नाही, हा प्रश्न काँग्रेस अध्यक्षांना पडला असावा. त्यामुळेच त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना लोकसभेत विरोध करण्याचे आदेश दिले. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तींवरून राजकारण करण्याचा प्रकार आहे, अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली.
इराकमध्ये भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे, याची खातरजमा करण्यासाठी मी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जातीने बोलले होते. मी त्यांच्याकडे पुरावे देण्यासाठी विनंती केली होती. एखादी व्यक्ती हरवली म्हणजे तिचा मृत्यू झाला, असा आमच्या सरकारचा कारभार नाही. यापूर्वी कोणीही परदेशात हरवलेल्या व्यक्तींविषयी अशाप्रकारे संसदेत स्पष्टीकरण दिले नव्हेत. मात्र, मी हे स्वत:चे कर्तव्य समजत असल्यामुळे त्याविषयी संसदेपुढे माहिती दिली. कोणत्याही व्यक्तींचे मृतदेह आमच्याच लोकांचे आहे, असे सांगून आम्ही ही फाईल बंद केली असती तर ते खूप मोठे पाप ठरले असते. मात्र, आम्ही या मृत व्यक्तींचे डीएनए तपासून त्या भारतीय व्यक्तीच असल्याची खातरजमा केल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.
तीन वर्षापूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेने मोसुलचा ताबा घेतल्यानंतर सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. मोसुलमधून भारतीय मजुरांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा इसिसने त्यांचे अपहरण केलं होतं.
काय म्हणाल्या सुषमा स्वराज ?
हरजीत मसीह यांनी सांगितलेला प्रकार खोटा आहे. मोसुलमध्ये 39 भारतीय मारले गेले.
एका केटररने सांगितले की, सर्वांना इसिसने टेक्सटाइल फॅक्टमध्ये घेऊन गेले होते. तेथे बांगलादेशी आणि भारतीय नागरींकाना वेगळं ठेवण्यात आलं.
हरजीतला बांगलादेशचा अली म्हणून बाहेर काढल्याचे केटररने सांगितले.
यापूर्वी संसदेत याविषयावर मी निवेदन दिले होते, त्यावेळी इराकचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते.
व्ही.के सिंह यांच्यासह अन्य आधिकारी इराकमध्ये बेपत्ता भारतीयांचा शोध घेत होते त्यावेळी तिथे 'डीप पेनिट्रेशन' मागितले होते.
जमिनीमध्ये भारतीयांना गाढल्याची आमची शंका होती.
सध्या भारतीयांना मारल्याचे पुरावे मिळाले आहे. डोंगर खोदून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये लोकांचा सापळा मिळाला आहे.
डीएनए टेस्टमध्ये सर्वात प्रथम संदीप नावाच्या भारतीयाचे नाव समोर आले. काल आणखी 38 भारतीयांचा डीएनए मॅच झाला आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री व्हीके सिंग यांची मी आभारी आहे. त्यांनी ध्येर्याने हे सर्व प्रकरण हाताळले.
असे झाले अपहरण -
इराकमध्ये अपहरण झालेल्या 38 भारतीयांमध्ये पंजाबमधील लोक आधिक आहेत. ते सर्व मोसुल आणि त्याच्या जवळील शहरामध्ये मजुरी करत होते. 2014मध्ये इसिस या दहशतवादी संघटनेने मेहसुलचा ताबा घेतल्यानंतर सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. मोसुलमधून भारतीय मजुरांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा इसिसने त्यांना एका तुरुंगात ठेवलं होते. त्यावेळी तिथे बांगलादेशी आणि भारतीय नागरिकांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. यावेळी इसिसने त्यांच्याकडून मजुरी करुन घेतली होती.