शहर अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस *एनसीपीत भोईर पितापुत्रांसह, डावखरे, मुल्ला, राऊळ यांच्यात संघर्ष *कॉंग्रेसमध्ये कानडे, शिंदे, पवार, घाडीगांवकर, के. वृषाली

By admin | Published: April 13, 2015 11:53 PM2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30

ठाणे

In the Congress and Nationalist Congress Party (NCP), Bhoir, along with the fatherhood, the fight between Left, Mullah and Raul * Congress in Kanade, Shinde, Pawar, Ghadiigaonkar, K. Vrishali | शहर अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस *एनसीपीत भोईर पितापुत्रांसह, डावखरे, मुल्ला, राऊळ यांच्यात संघर्ष *कॉंग्रेसमध्ये कानडे, शिंदे, पवार, घाडीगांवकर, के. वृषाली

शहर अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस *एनसीपीत भोईर पितापुत्रांसह, डावखरे, मुल्ला, राऊळ यांच्यात संघर्ष *कॉंग्रेसमध्ये कानडे, शिंदे, पवार, घाडीगांवकर, के. वृषाली

Next
णे
स्विकृत सदस्याच्या निवडणुकीनंतर ठाणे शहर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शहरात बरीच उलथापालथ झाली असून काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांची उचलबांगडी करु न त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीने शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांना पदावरुन पायउतार केल्याने या दोनही पक्षात शहर अध्यक्ष पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये आव्हाड गट आणि डावखरे गट या असा संघर्ष पेटला आहे. तर कॉंग्रेसमध्ये पुन्हा पक्षापासून अलिप्त असल्यांनी अध्यक्ष मिळावे म्हणून पक्षश्रेष्ठींकडे मनधरणी करत आहे. परंतु असे असेल तरी मागील वर्षभर शहर अध्यक्षविना काम करणार्‍या शहर भाजपामध्ये शहर अध्यक्षपदासाठी आजही कोणत्याही प्रकारच्या हालचाली होतांना दिसत नाही. परंतु शिवसेनेचे शहर प्रमुख पद हे आजही शोभेचेच बाहुले ठरलेले आहे.
स्विकृत नगरसेवकपदावर प्रदीप राव यांची वर्णी लावल्याने कॉंग्रेसने गटनेतेपदावरुन विक्रांत चव्हाण आणि शहराध्यक्षपदावरुन बाळकृष्ण पूर्णेकर यांची उचलबांगडी केली. विशेष म्हणजे गटनेते बदलण्याचा निर्णय नगरसेवकांनी घ्यावयाचा असल्यामुळे चव्हाण यांना अभय मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पूर्णेकर यांची उचलबांगडी निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीमधील निर्णयाचा खुलासा पूर्णेकर यांनी केला आहे. तरीही, त्यांना या पदावरुन हटविण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी घेतला आहे. त्यामुळे या पदासाठी ठाणे काँग्रेसमध्ये इच्छुकांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यामध्ये सर्वात आघाडीवर काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कानडे हे असल्याचे समजते. गुरुदास कामत यांच्या मदतीने त्यांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला आहे. तर, मनोज शिंदे, नारायण पवार, संजय घाडीगावकर आणि महिलांमधून के. वृषाली यांनी पक्षश्रेष्ठींकडे खेटे घालण्यास सुरु वात केल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर, दुसरीकडे बाळकृष्ण पूर्णेकर यांचे पद जाणार असल्याने आपल्या मर्जीतील माणूस या पदावर विराजमान व्हावा, यासाठी पूर्णेकरांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मनोज शिंदे आणि नारायण पवार हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आता शहर अध्यक्ष पदावरुन संघर्ष पेटला आहे. अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणुकांची तयारी न केल्याचा ठपका ठेऊन मनोज प्रधान यांना कार्यमुक्त केल्याचे सांगितले जात असले तरीही स्विकृत नगरसेवकपद देण्यात आल्यानेच त्यांना पदमुक्त करण्यात आले असल्याचे समजते. सध्या ठाणे राष्ट्रवादीचा कारभार हा कोअर कमिटीच्या माध्यमातून चालविला जात असला तरीही, या कोअर कमिटीमध्ये कार्यरत असणारे निरंजन डावखरे, नजीब मुल्ला आणि अशोक राऊळ हे तिघेजण अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षपदासाठी विधानपरिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच गळ घातली आहे. तर, अशोक राऊळ यांना प्रदेशाध्यक्षांनी स्विकृत नगरसेवकपदासाठी पत्र देऊनही त्यांना बाजूला सारण्यात आल्याने आता आपणाला संधी मिळावी, असा दावा त्यांनी केला आहे. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे कडवे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आव्हाड आपले वजन खर्ची घालून ठाणे राष्ट्रवादीवरील आपला ताबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर, संजय भोईर यांचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळून त्यांची गटनेतेपदावर बोळवण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आता शहराध्यक्षपदावर दावा केला आहे. विशेष म्हणजे, देवराम भोईर यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. ती भरपाई अध्यक्षपद देऊन पूर्ण करावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचा नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केल्याने अनेकजण आपापल्या पाठिराख्यांना अध्यक्ष बनविण्यासाठी सेटींग करण्यात मश्गुल झाले आहेत.
भाजपाचा शहर अध्यक्षा विना कारभार...
कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये शहर अध्यक्षपदासाठी संघर्ष पेटला असतांना मागील सुमारे एक वर्ष भाजपाचे शहर अध्यक्षपद हे रिक्तच असून, मिलिंद पाटणकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर या पदासाठी अनेकांनी घुडग्याला बाशींग बांधले होते. परंतु ते देखील आता निरुत्साही झाले आहेत. पक्ष श्रेष्ठींकडून अद्यापही कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्याने शहर अध्यक्षाविनाच सध्या भाजपाचा कारभार सुरु आहे.
*शिवसेनेचे शहर प्रमुखपद शोभेचेच...
कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये शहर अध्यक्ष पदाला किती वजन आहे, याची प्रचिती सध्या इतर पक्षांना सुध्दा आली असून, शहर अध्यक्ष मिळण्यासाठी सत्ता संघर्ष सुरु झाला आहे. असे असतांना गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेचे शहर प्रमुख पद हे शोभेचेच बाहुले ठरले आहे. पद असूनही ते केवळ नावापुर्तेच असल्याची चर्चा सध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. पद असून त्याचे रिमोट कंट्रोल मात्र दुसरीकडेच असल्याने हे पद सध्या नावालाच उरले आहे.

Web Title: In the Congress and Nationalist Congress Party (NCP), Bhoir, along with the fatherhood, the fight between Left, Mullah and Raul * Congress in Kanade, Shinde, Pawar, Ghadiigaonkar, K. Vrishali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.